ठळक बातम्या

ऑक्सिजनअभावी किती मृत्यू झाले?, महाराष्ट्राने माहिती दिली नाही – केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी मांडले वास्तव

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेत कोरोना विषाणू संसर्गावर चर्चा सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी शुक्रवारी कोरोनासंदर्भात लोकसभेत निवेदन केले. मनसुख मंडाविया यांनी आम्ही राज्यांकडे ऑक्सिजनमुळे किती जण दगावले असल्याची माहिती मागवली होती, असे सांगितले. मात्र केवळ १९ राज्यांनी माहिती दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजनअभावी दगावलेल्या रुग्णांची माहिती दिली नसल्याचे मनसुख मंडाविया म्हणाले. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. ऑक्सिजनमुळे किती कोरोना रुग्ण दगावले?, याची माहिती अद्याप महाराष्ट्र सरकारने दिली नाही, अशी माहिती मनसुख मंडाविया यांनी दिली. केंद्र सरकारला केवळ १९ राज्यांनी माहिती दिली. त्यात महाराष्ट्राचा सहभाग नाही, असेही केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले.
मनसुख मंडाविया म्हणाले की, आम्ही राज्यांना ऑक्सिजनअभावी किती जण दगावले?, याची माहिती मागवली होती, पण केवळ १९ राज्यांनी माहिती दिली. त्यात केवळ पंजाबने सांगितले की, चार जणांचा मृत्यू झाला असे मंडाविया म्हणाले. अंदमान-निकोबार, दादरा-नगर हवेली, दमण-दीव, उत्तर प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, आसाम, पंजाब, जम्मू-काश्मीर, लडाख, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, झारखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी व कें द्रशासित प्रदेशांनी केंद्र सरकारला माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी ऑक्सिजनअभावी किती जणांचा मृत्यू झाला?, यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी लोकसभेत ही माहिती दिली. काही राज्यांनी आवश्यकतेपेक्षा जास्त ऑक्सिजनची मागणी केली याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …