ऐतिहासिक दिवस


२१ आॅक्टोबर या दिवशी भारताने शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला. हा दिवस आणि क्षण अत्यंत ऐतिहासिक असा होता. जगात सर्वात मोठे लसीकरण करणारा भारत हा एकमेव देश ठरलेला आहे. त्यामुळे या मोहिमेतील प्रत्येक जण हा अभिनंदनास पात्र आहे. कोविडच्या साथीकडे आपण एक युद्ध म्हणूनच पाहत होतो. ते युद्ध आता आपण जिंकत आहोत याची ती साक्ष होती, म्हणूनच भारताने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडून इतिहास रचला आहे. देशात आतापर्यंत दिलेल्या कोरोनाविरोधी लसींच्या डोसची संख्या १०० कोटींच्या पुढे गेली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताने इतिहास रचला आहे, हा भारतीय विज्ञान, उद्योग, भारतीयांच्या सामूहिक भावनेचा विजय आहे, असे म्हटले आहे. लसींच्या डोसची संख्या १०० कोटी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे राम मनोहर लोहिया रुग्णालयात पोहोचले होते. जिथे त्यांनी रुग्णालय अधिकाºयांशी संवाद साधला.

या घटनेबाबत संपूर्ण देशभरातून आनंद व्यक्त केला गेला. एकूणच गेल्यावर्षी कोविडची साथ आल्यावर पंतप्रधान मोदींनी ज्याप्रकारे परिस्थिती हाताळली आणि सर्वांना विश्वास दिला ती बाब वाखाणण्याजोगी आहे. काहींनी त्याची हेटाळणी केली, पण हेटाळणी केली तरी मोदींच्या आवाहनाला प्रतिसादही दिला. एक दिवसाचा लॉकडाऊन केल्यावर थाळ्या वाजवा, घंटा वाजवा या आवाहनाला विरोधक असलेल्या शरद पवारांनीही घंटा वाजवली होतीच. त्यामुळे नंतर कितीही मोदी सरकारच्या विरोधात शंखनाद केला, तरी मोदी सरकार योग्य पावले उचलत होते, यावर त्यांचाही विश्वास होताच. म्हणूनच या युद्धात लढणाºया प्रत्येक कोविड योद्धा, डॉक्टर, नर्स, स्वच्छता सफाई कर्मचारी, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, केंद्र आणि राज्य सरकारे आणि याला प्रसिद्धी देणारी माध्यमे हे सर्व अभिनंदनास पात्र आहेत. याशिवाय ज्यांनी झटपटीने या लसीकरणाची तयारी केली. त्या सिरम इन्सिट्यूटचे आदर पुनावाला आणि अन्य कंपन्यांही या यशात मोठे योगदान देणाºया ठरल्या आहेत.
सुरुवातीला विरोधी पक्षांनी लसीकरणाचे राजकारण केले, पण त्या राजकारणाला न भीता मोदी सरकारने आपली वाटचाल सुरू ठेवली. वाचाळवीर म्हणून ख्याती होत चाललेल्या नवाब मलिक यांनी मोदींनी लस घ्यावी असे सुरुवातीला वक्तव्य केले होते. लसीकरणाबाबत सरकारला यश येत असलेले या अंतर्गत शत्रूंना पाहवत नव्हते. त्यामुळे सुरुवातीला लसीकरणाचा वेग मंदावला होता, पण मोदींनी लस घेतली. मुख्यमंत्र्यांनी घेतली. विविध मान्यवरांनी घेतली म्हटल्यावर लसीकरणाचा वेग वाढला. त्यानंतर आम्हाला साठा मिळत नाही, लसींचा तुटवडा आहे, यावरून राजकारण सुरू केले, पण तरीही लसींचे वाटप योग्यप्रकारे करत सर्वांना न्याय देण्याचे काम केंद्र सरकारने केले, म्हणून हे यश लाभले आहे. महाराष्ट्रातही नऊ कोटींपेक्षा जास्त लसीकरण झालेले आहे. १२ कोटी लोकसंख्या असताना त्यातील १८ वर्षांच्या आतील लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण खूपच चांगले आहे. त्यामुळे महाराष्ट्रानेही जवळपास दहा टक्के वाटा या युद्धात उचलला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारही विशेषत: मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री अभिनंदनास पात्र ठरतात. या ऐतिहासिक यशात त्यांचे योगदान हे अनमोल असेच आहे.

म्हणूनच २१ आॅक्टोबर २०२१चा हा दिवस इतिहासात नोंदवला गेला आहे. १०० वर्षांत आलेल्या सर्वात मोठ्या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी देशाकडे १०० कोटींच्या लसीकरणाचे मजबूत सुरक्षा कवच आहे. ही कामगिरी भारताची आहे. देशाच्या लसनिर्मिती करणाºया, पुरवठा करणाºया आणि लस देणाºया सर्वांचे मनापासून आभार मानतो, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी आनंद व्यक्त केला. आपण एकत्रितपणे कोरोनाला पराभूत केले पाहिजे. मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. १०० कोटी लसींच्या डोसचे हे यश मी प्रत्येक देशवासियांना समर्पित करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. हा त्यांनी दिलेला विश्वास फार महत्त्वाचा आहे.
विशेष म्हणजे या क्षणानंतर पंतप्रधान मोदींच्या चेहºयावर अत्यंतीक आनंद दिसत होता. युद्ध जिंकणाºया योद्ध्याप्रमाणे तो आनंद दिसत होता. त्यामुळे तातडीने तसे ट्विटही त्यांनी केले. यामध्ये भारताने इतिहास रचला आहे. आम्ही भारतीय विज्ञान, उद्योग आणि १३० कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेच्या विजयाचे साक्षीदार आहोत. १०० कोटी लसीकरण पार केल्याबद्दल भारताचे अभिनंदन. आमच्या डॉक्टर, परिचारिका आणि प्रत्येकाने ज्यांनी ही कामगिरी साध्य करण्यासाठी काम केले त्यांचे आभार, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ही लसीकरण मोहीम पुढे नेल्याबद्दल आरोग्य कर्मचाºयांचे भरभरून कौतुक केले.

आज संपूर्ण जगाला हेवा वाटावा, अशी परिस्थिती भारतात या लसीकणाच्या मोहिमेमुळे निर्माण झालेली आहे. अत्यंत कमी कालावधीत एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात हे शक्य करून दाखवले. भारताने विशेष म्हणजे फक्त भारतीयांनाच लसी दिल्या असे नाही, तर अन्य देशांनाही लसींचा पुरवठा केला आणि जागतिक आरोग्याच्या लढ्यात मोठे योगदान दिलेले आहे. परदेशात लसी पाठवल्यामुळे सुरुवातीला विरोधकांनी मोदींवर प्रचंड टीका केली, पण मोदी सरकारचे या लसीकरण मोहिमेचे नियोजन हे अत्यंत उत्तम दर्जाचे होते. जास्तीत जास्त लोकांना मोफत लसीची सुविधा सरकारने दिली. त्यामुळे हे यश पदरात पडताना दिसत आहे.

About Editor

अवश्य वाचा

आसामी दणका

 गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा आसाम पोलिसांनी गुजरातमधील पालनपूर येथील सर्किट हाऊसमधून …

Leave a Reply

Your email address will not be published.