एसटी संप : ३ हजारपेक्षा जास्त कर्मचारी एकाच दिवसात निलंबित

मुंबई – एसटी कर्मचाºयांच्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपाला हिंसक वळण लागले आहे. विलिनीकरणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याने कर्मचाºयांच्या सहनशीलतेला हिंसक वळण लागत असल्याचे निदर्शनास येत आहे. राज्यात काही भागांत सुरू होत असलेल्या एसटी आणि महामंडळाने कारवाईत वाढ केल्यामुळे काही भागांतून विरोधही वाढू लागला आहे. त्यामुळे शनिवारी ११ हून अधिक एसटी गाड्यांवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. यात चालक, वाहकही जखमी झाले आहेत. दगडफेक करणाºया अज्ञात व्यक्तींच्या विरोधात एसटी महामंडळाच्या वतीने स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महामंडळाने यासंदर्भात निलंबनाची कारवाई अधिक तीव्र केली असून, शनिवारी ३ हजार १० कर्मचारी निलंबित केल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. राज्यातील विविध आगारांतून सुटणाºया एसटी गाड्यांना पोलीस संरक्षण देण्यात येत आहे; परंतु आगारातून सुटताच काही अंतरावर जाताच एसटीवर दगडफेक केली जात आहे. शनिवारी एकाच दिवसात ३ हजार २१५ चालक आणि वाहक कामावर परतले. त्यामुळे आतापर्यंत ४ हजार २४२ चालक आणि वाहक पुन्हा कर्तव्यावर रुजू झाल्याची नोंद आहे.
विविध विभागांतील एकूण १८ हजार कर्मचारी कर्तव्यावर आल्याची माहिती महामंडळाने दिली. कामावर न येणाºया कर्मचाºयांवर येत्या आठवड्यात महामंडळाकडून कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. राज्यात एसटी धावण्याचे प्रमाण आणखी वाढले. शनिवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत १ हजार ४६ एसटी धावल्या. तुटेपर्यंत ताणणे हितावह नाही, असे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने एसटीतील संपकरी कर्मचाºयांना म्हटले आहे. २८ एसटी कामगार संघटनांच्या एकजुटीतून मोठा दबाव आणल्यानेच ४१ टक्के वेतनवाढ करणे शासनाला भाग पडले आहे. हे कर्मचाºयांचे यश आहे.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …