सोलापूर – एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हिटलरशाही पद्धतीने मोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा संप संवादाने सोडवायला हवा. कर्मचारी आंदोलकांच्या प्रतिनिधींनी चर्चा करून प्रश्न सोडवला पाहिजे, तसेच सरकारने सहानुभूतीने संप हाताळला पाहिजे, असे मत भाजप नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडले. सोलापुरात ते बोलत होते. वीज सवलत नाही दिली, मोफत वीज देत नाहीत, शेतकऱ्यांचे कनेक्शन कट केले जात आहे. शेतकऱ्यांकडून बील हे टप्प्याटप्प्याने घ्यावे, मात्र वीजपुरवठा खंडित करू नये. यातून जे आंदोलन होईल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला. ओबीसी आरक्षणासंदर्भात बेजबाबदार आणि बेफिकीरपणा राज्य सरकारने केला आहे. मराठा आरक्षणाप्रमाणेच ओबीसी आरक्षणाबाबतही तेच केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यानेच ओबीसी आरक्षणाला स्थगिती आली, असा आरोप त्यांनी केला. अध्यादेश काढणे हा केवळ वेळकाढूपणा आहे. फडणवीसांनी सुचवलेल्या पर्यायांचा विचार राज्य सरकारने केला नाही. ओबीसी आरक्षणाबाबत सर्व विरोधीपक्ष सोबत आहेत, तर निवडणुका पुढे ढकलायच्या की नाही याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल, असे ते म्हणाले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …