एसटी संप : कर्मचाऱ्यांवर अखेर राज्य सरकारकडून बडतर्फीचे हत्यार

कारणे दाखवा नोटीस पाठवणार

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत कामावर रुजू होण्यासाठी अल्टीमेटम देऊनही काही ठिकाणी एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. त्यानंतर अखेर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारकडून मंगळवारपासून बडतर्फीची कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. गेले अनेक दिवस कामावर हजर न राहिल्याने महामंडळाने हे पाऊल उचलले आहे.
कामावर हजर न राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फ प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आजपासून कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. याआधी सोमवारपर्यंत कामावर हजर राहा नाही, तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी इशारा दिला होता. त्यानंतर देखील कामगार कामावर हजर राहिले नाही, त्यामुळे राज्य सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे, तसेच राज्य सरकाच्या विनंतीनंतर जे कर्मचारी कामावर हजर राहिलेले नाहीत, त्यांना मंगळवारपासून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देण्यासाठी ७ किंवा १५ दिवसांचा कालावधी दिला जात आहे. त्यानंतर तीन सुनावणी होतील, त्यात जर दोषी आढळले, तर बडतर्फीची नोटीस दिली जाते. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी पुन्हा ७ दिवसांचा कालावधी दिला जातो आणि त्यानंतर बडतर्फीची कारवाई केली जाते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …