एसटी चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर – आपल्या मागण्यासाठी राज्यातील विविध बस डेपोमध्ये बेमुदत संप पुकारण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करीत असल्याचे सरकारने सांगितल्याने मध्यरात्रीच संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे, मात्र शुक्रवारची सकाळ शेवगावमध्ये एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्या केली. शेवगाव येथील एसटी डेपोमध्येचालक दिलीप हरिभाऊ काकडे (वय ५६, रा. आव्हाने, ता. शेवगाव) यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेलेनाही. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या आतापर्यंत झालेल्या आत्महत्यांमागेआर्थिक विवंचनेचे कारण असल्याचे पुढे आले आहे, तेच यामागेही असावेअसा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
लॉकडाउननंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. आर्थिक विंवचेतून या आत्महत्या होत आहेत. यातील बहुतांश घटना एसटी डेपोत किंवा स्थानकात एसटी बसलाच गळफास लावून झालेल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात हाही एक मुद्दा होता. सरकारच्या धोरणावर कर्मचारी नाराज असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. कर्मचऱ्यांनी संप पुकरलेला असल्यानेसर्वगाड्या डेपोत आणून उभ्या करण्यात आल्या होत्या. रात्री काकडे शेवटची बस घेऊन डेपोत आले आणि एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झाले. मध्यरात्री संप मिटल्याची घोषणाही झाली, मात्र डेपोमध्येउभ्या असलेल्या बसच्या शिडीला दोरी बांधून त्यांनी आत्महत्या केली. भल्या सकाळी ही घटना उघडकीस आली. शुक्रवारी सकाळी डेपोत उभ्या असलेल्या बसला (क्र. एम. एच. ४० एन ८८४९) मागील बाजूला दोरीच्या सहाय्याने काकडे गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. सकाळी सव्वा सहाच्या सुमारास इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यानंतर पोलिसांनी कळविण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला.
काकडे यांच्या सेवानिवृत्तीला चारच वर्षे राहिली होती. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. तालुक्यातील आव्हाने या गावाचेतेरहिवाशी आहेत. त्यांनी आत्महत्या का केली, हे अद्याप समजू शकले नाही. त्या आधी ते सर्वांचे नेहमीप्रमाणेवागताना दिसत होते. कोणताही तणाव वगैरे दिसून आला नसल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. पोलीस चौकशी सुरू आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …