एसटी खासगीकरणाचा विचार केला नाही – अनिल परब

मुंबई – एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनिकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून एसटी महाडळाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन पुकारलेआहे.एसटी अधिकाऱ्यांसोबत जी बैठक झाली त्यात एसटीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांवर चर्चा झाली. एसटीचेउत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. एसटी खासगीकरणाचा विचार केला नाही. परंतु वेगवेगळ्या पर्यायात खासगीकरण हादेखील पर्याय आहे. कामगारांसोबत लोकांचीही जबाबदारी राज्य सरकारची आहेअसे विधान परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेआहे. एसटीच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावर ते बोलत होते.
अनिल परब म्हणाले की, कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचेआवाहन दररोज करतोय, परंतु कर्मचारी संपावर ठाम आहेत. विलिनीकरणाची मागणी हायकोर्टानंजी समिती नेमली आहे. त्याचा रिपोर्टआल्यावरच निर्णय घेऊ शकतो. कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांवर चर्चाकरण्यास तयार आहे. कामगारांच्या संपाचंनेतृत्व कोण करतंय? हे कळत नाही. एसटी संपामुळे कर्मचाऱ्यांचे किंबुहना एसटीचेनुकसान होतंय हे हानीकारक आहे. बाकीच्या राज्यातील परिवहन सेवेचा अभ्यास करत आहोत. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्याशी दोनदा चर्चा केली. दोन्ही वेळा त्यांनी कामगारांशी बोलतो आणि कळवतो असं सांगितले. परंतु त्यांच्याकडून पुढे काहीच प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे नेमकं आंदोलनाचं नेतृत्व करतंय कोण? यावर प्रश्नचिन्ह आहे असं त्यांनी सांगितले. संप ताबोडतोब मागे घेऊन वेतनवाढीचा प्रश्नावर सरकारशी चर्चा करून समस्या सोडवून घ्यायला हव्यात. देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेचा गंभीर विचार करुन त्यावर अभ्यास केला आहे. सरकारकडून पैसे घेऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवता येतील, पण थोडा वेळ द्यावा लागेल. संप मागे घेऊन चर्चाकरावी लागेल. शासनास वेठीस धरुन हा संप सुटणार नाही. ज्यांना अल्टिमेटम दिला होता. जे कामावर रुजू झाले नाहीत त्यांच्यावर कारवाई सुरु झाली आहे अशी माहितीही अनिल परब यांनी दिली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …