मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातले एसटी महामंडळाचे कर्मचारी आपल्या काही मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी संप केल्याने राज्य सरकारने त्यापैकी काही मागण्या मान्यही केल्या, मात्र आता कर्मचाऱ्यांनी आपला राज्य सरकारमध्येसमावेश करुन घेण्यासंदर्भातली मागणी केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी राज ठाकरेयांनी या पत्राद्वारे केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी मान्य करण्याबाबत अद्याप राज्य सरकारकडून काहीही ठोस आश्वासनं देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचेवातावण आहे. जर या आंदोलन अथवा संपात सहभागी झालेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई झाली तर कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशारा राज ठाकरे यांनी पत्राद्वारेदिला आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …