ठळक बातम्या

एसटी कर्मचाºयांवर कडक कारवाई : १९८० जणांची सेवासमाप्ती, तर ९३८४ निलंबित

 

मुंबई – महाराष्ट्र राज्य सरकार एसटी कर्मचाºयांच्या संपावरून आक्रमक भूमिका स्वीकारण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून कारवाई सुरूच ठेवण्यात आली असून, दिवसभरात तब्बल १९२ कर्मचाºयांचे निलंबन करण्यात आले, तर १९८० कर्मचाºयांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. एकूण निलंबित कर्मचाºयांची संख्या ९,३८४ आहे. तसेच एसटी कर्मचाºयांचा संप बेकायदेशीर असल्याचे म्हणत, मेस्मा लावण्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करा या मागणीसाठी मागील ३५ दिवसांपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. पगारवाढीची घोषणा राज्य सरकारने केल्यानंतरही काही कर्मचारी संप करत आहेत. राज्य शासनाने एसटी कर्मचाºयांच्या वेतनात भरघोस वाढ केली. मात्र, कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. संप सुरूच ठेवण्याची त्यांची भूमिका आहे.
एसटी कर्मचाºयांचा संप एक महिन्याहून अधिक काळापासून सुरू आहे. राज्यात ४५० कोटींचे नुकसान झाले आहे. राज्यातील विविध मार्गावर १ हजार ३८२ एसटी धावल्या. त्यामध्ये २११ शिवशाही, ७८ शिवनेरी आणि १०९३ साध्या गाड्यांचा समावेश आहे, तर १८ हजार ८२८ कर्मचारी कामावर रुजू झाले. यामध्ये २१२४ चालक, तर २,२९४ वाहकांचा समावेश आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …