मुंबई- एसटी कर्मचाºयांचा संप सलग सोळाव्या दिवशीही सुरू आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाºयांच्या वेतनवाढीची घोषणा केली, त्यानंतर संपाला पाठबळ देणाºया राजकीय नेत्यांनीही संपातून माघार घेतली, मात्र कद्यापही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत, तर राज्यात काही ठिकाणी पोलीस संरक्षणात एसटी वाहतूक सुरू करण्यात आली़ तसेच, सरकारकडून कर्मचाºयांना आज शेवटचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. संपातून कामावर परतणाºया एसटी कर्मचाºयांची अडवणूक केल्यास त्यांच्यावर कारवाईकरणार असल्याचा इशारा राज्याचेपरिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
एसटी महामंडळाचेराज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीबाबत उच्च न्यायलयाची समिती जो निर्णय देईल त्यानुसार निर्णय घेण्यात येणार आहे़ एसटी कर्मचाºयांना संरक्षण देण्यात येणार असल्याचे सांगत राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनीही आज पुन्हा एकदा कर्मचाºयांना कामावर हजर होण्याचेआवाहन केलेआहे.
राज्य सरकार, एसटी महामंडळानेकर्मचाºयांच्या वेतनात वाढ केली. एसटी कर्मचाºयांच्या संपात सहभागी झालेलेभाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी देखील आंदोलनातून माघार घेण्याची घोषणा केली. एसटी कर्मचाºयांना दिलेली वेतन वाढ आणि भाजप नेत्यांनी घेतलेली माघार यानंतर एसटी कर्मचाºयांना कामावर परतण्याचेआवाहन महामंडळाने केले होते. त्यानंतर शुक्रवारपासून राज्यातील एसटी वाहतूक सुरळीत होईल अशी अटकळ बांधली जात होती. राज्यात काही ठिकाणी पोलीस संरक्षणात एसटी वाहतूक सुरू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाºयांचा संप लवकरात लवकर मिटेल असा विश्वास व्यक्त केला.
राज्यातील सुरू असलेल्या एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपाला लवकरच महिना होईल. अशातच संपकरी एसटी कर्मचाºयांना महिन्याचा पगार मिळणार नसल्याच्या चर्चा आहेत. त्यावर अनिल परब यांनी उत्तर दिलेआहे.औद्योगिक न्यायलयाने संप बेकायदेशीर ठरवल्यास एसटी महामंडळाच्या तरतुदीनुसार, एक दिवसाच्या संपासाठी आठ दिवसांचा पगार कापण्यात येईल. त्यामुळे कर्मचाºयांनी लवकर कामावर रुजू व्हावे, कारवाई करण्यास महामंडळाला भाग पाडू नये असे आवाहन अनिल परब यांनी केले. एसटीचे होणारेनुकसान हेराज्याचेआणि कर्मचाºयांचे नुकसान होत आहे़एसटीने प्रवास करणारे प्रवासी हे आपलं दैवत आहेत. त्यांनी आपल्याकडेपाठ फिरवली तर एसटी अधिक अडचणीत येईल. कामगारांनी कारवाई करण्यासाठी भाग पाडू नये. न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवला तर एक दिवसाला ८ दिवसांची पगारकपात केली जाईल. कर्मचाºयांचेआर्थिक नुकसान करायचे नाही. जे कर्मचारी कामावर येतील त्यांना संरक्षण दिलेजाईल आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाºयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा अनिल परब यांनी केला आहे.
वेतनवाढ आणि सरकारनेकामावर परतण्याचा दिलेल्या अल्टिमेटमनंतर संपकरी एसटी कर्मचारी हळूहळू कामावर परतू लागले आहेत. त्यामुळे राज्यात विविध आगारामधून एसटी धावू लागल्या आहेत. एसटी पुन्हा एकदा सुरु झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केलाय. जवळपास दहा हजार एसटी कर्मचारी कामावर परतल्याचा दावा सरकारने केला आहे. दरम्यान, एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ९२ हजार २६६ कर्मचारी आहेत. संपात ८२,५६१ कर्मचाºयांनी संपात सहभाग घेतला असून यात चालक-वाहक तसेच कार्यशाळेतील एकूण ७९,६१७ कर्मचाºयांचा समावेश आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत ९,७०५ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …