एसटी आंदोलनामुळे ६०० कोटींचे नुकसान

  •  एसटी खड्ड्यात जाणार नाही याची काळजी घ्या – अनिल परब

सोलापूर – राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत कोणताच तोडगा निघताना दिसत नाही. कर्मचाऱ्यांना सरकारकडून वेगवेगळे प्रस्ताव दिले असतानाही अनेक कर्मचारी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामावर परतत असले, तरी अनेक कर्मचारी अजूनही कामावर आलेले नाहीत. आता महामंडळाने एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या चालकांची करार पद्धतीने नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडे ५५ हजार संपकऱ्यांना नोटीस बजावली आहे.
परिवहन मंत्री अनिल परब शुक्रवारी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी एसटी संपावर पुन्हा एकदा भाष्य केले. एसटी आंदोलनामुळे राज्याचे जवळपास ६०० कोटींचे नुकसान झाले आहे. शाळा, कॉलेज सुरू झाले आहेत. संपामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे, असे परब म्हणाले. मी स्वत: अनेक कर्मचाऱ्यांना भेटत आहे. त्यांना आवाहन करत आहे. समिती याबाबत निर्णय घेणार आहे. त्यामुळे संप सुरू ठवण्याला अर्थ नाही. आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक आणि राज्याचे मोठे नुकसान होत आहे, असे ते म्हणाले. अनेक कर्मचारी आता रुजू झाले आहेत, मात्र जे कर्मचारी रुजू झालेले नाहीत, त्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो. एसटी खड्ड्यात जाणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन परब यांनी कर्मचाऱ्यांना केले. ते पुढे म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जसे आमचे दायित्व आहे, तसे राज्याच्या बाबतीत देखील आमचे दायित्व आहे. आंदोलनामुळे राज्याचे मोठे नुकसान होत आहे. इतक्या वेळी आवाहन करून देखील जर ऐकणार नसतील कारवाई शिवाय पर्याय नाही. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांची कारवाई मागे घेण्याचा प्रश्न येतच नाही. व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आम्हाला कर्मचारी भरती करावी लागेल, असेही ते म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …