एशियन मास्टर्स मॅरेथॉनचे भारतात आयोजन

नवी दिल्ली – भारतीय मास्टर्स ॲथलेटिक्स संघ (एमएएफआय) पुढील वर्षी देशात एशियाई मास्टर्स मॅरेथॉनच्या सुरुवाती सत्राचे आयोजन करेल. एका प्रसिद्धीपत्रकातील माहितीनुसार, ४० पेक्षा जास्त आशियाई देशांतील ३५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ॲथलेटिक्स (धावपटू) मॅरेथॉन (४२.१९५ किमी), अर्ध मॅरेथॉन (२१.०९७ किमी) व १० किमी शर्यतीत भाग घेण्याची अपेक्षा आहे. एमएएफआय म्हणाले की, २०२२ च्या अखेरच्या तीन महिन्यांत होणारी शर्यत सर्वोच्च तांत्रिक निकषांनुसार पार पडेल. एशियाई मास्टर्स ॲथलेटिक्स (एएमए)चे सचिव एस. शिवप्रगसम म्हणाले की, ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या बैठकीत एएमए समितीने एमएएफआयद्वारे सदर प्रस्तावाला पाठिंबा दिला व भारताच्या यजमानांना अधिकार दिले. ते पुढे म्हणाले, एएमए या आयोजनासाठी एमएएफआयला तांत्रिक सहाय्यता प्रदान करेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …