ठळक बातम्या

एमपीएससी परीक्षांच्या तारखा जाहीर

मुंबई – एमपीएससी परीक्षा देऊ इच्छिणाºया उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शनिवारी एमपीएससी आयोगाने पुढील वर्षी २०२२ ला होणाºया सर्व अंदाजित परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे.
एमपीएससी वर्षभरात वर्ग एक आणि दोन साठीच्या विविध संवर्गांसाठी साधारण १३ प्रकारच्या परीक्षा घेते. याचे अंदाजे वार्षिक वेळापत्रक यूपीएससीच्या धर्तीवरच एमपीएससीने बºयाच वर्षांनंतर पहिल्यांदाच जाहीर केले आहे. परीक्षांच्या आधीच तारखा जाहीर झाल्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे परीक्षार्थींनी स्वागत केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२२ मध्ये आयोजित केल्या जाणाºया स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल मार्च महिन्यापर्यंत जाहीर करण्यात येणार आहे, तर मुख्य परीक्षा ७, ८ आणि ९ मे रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल आॅगस्ट २०२२ मध्ये जाहीर होणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा भाग असलेली पूर्व परीक्षा १२ मार्च २०२२ रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा २ जुलै २०२२ रोजी होईल, तर निकाल आॅगस्टमध्ये जाहीर होणार आहे.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …