एमपीएससी उमेदवारांसाठी आनंदाची बातमी

  • यंदा साडेसात हजार पदांसाठी निघणार भरती

मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी)ने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आनंदाची बातमी दिली आहे. २०२२ या वर्षात विविध विभागांमध्ये तब्बल ७ हजार ५६० रिक्त जागा भरल्या जाणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे. सर्वाधिक रिक्त पदे ही सामान्य प्रशासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, गृह, वित्त, सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय विभागांमध्ये आहेत. यासंदर्भातील सविस्तर रिक्त जागांची यादी ‘एमपीएससी’च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एमपीएससीने डिसेंबर २०२१ पर्यंतच्या राज्याच्या विविध विभागांकडून रिक्त जागांची माहिती मागवली होती. त्यानुसार राज्यात ७ हतार ५६० जागा रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या जागा २०२२ मध्ये भरण्यात येतील. त्यामुळे या वर्षात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी मिळणार आहे. राज्याच्या २५ विभागांमधील रिक्त असलेल्या पदांच्या संख्यानुसार राज्यात तिन्ही गटांच्या एकूण ७ हजार ५६० जागा रिक्त आहेत. त्यामध्ये ‘अ’ गटातील १४९९, ‘ब’ गटातील १२४५ आणि ‘क’ गटातील १५८३ पदांचा समावेश आहे. यासंदर्भातील सविस्तर रिक्त जागांची यादी एमपीएससीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …