ठळक बातम्या

एमएमए फायनल : रितू फोगाटसमोर फेयरटेक्सचे आव्हान

नवी दिल्ली – भारताची माजी कुस्तीपटू रितू फोगाट ३ डिसेंबरला ‘वन विमेन्स ॲटम वेट (४८ किलो) वर्ल्ड ग्रां प्री चॅम्पियनशीप (मिक्स्ड मार्शल आर्ट) फायनल’ मध्ये किक-बॉक्सिंगची विश्व चॅम्पियन थायलंडच्या स्टॅम्प फेयरटेक्सचा सामना करेल. फेयरटेक्स ‘मॉय थाई’ची माजी विश्व चॅम्पियन देखील आहे. ‘मॉय थाई’देखील मार्शल आर्टचे एक रूप असून ज्याचा उगम थायलंडमध्येच झाला. याला ‘आठ अंगाची कला’ म्हटले जाते. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असणारी रितू म्हणाली की, मी सिंगापूर इंडोर स्टेडियममध्ये ४८ किलो वजनी गटात आपल्या आगामी सामन्याच्या तयारीत कोणतीच कमतरता राखत नाही आहे. रितू पुढे म्हणाली, भारताकडून कोणतीच महिला आतापर्यंत एमएमए चॅम्पियन बनलेली नाही व आता माझ्याकडे ती स्थिती बदलणे व जागतिक व्यासपीठावर भारतीय महिलांना ओळख मिळवून द्यायची संधी आहे. मी भारताची मान उंचावण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. ती पुढे म्हणते, मी मोठ्या कालावधीपासून फायनलची तयारी करत आहे व मी मागील दोन वर्षांत अनेक तास प्रशिक्षण घेतले आहे. तिची प्रतिस्पर्धी फेयरटेक्सला या वजनी गटात अत्यंत धोकादायक खेळाडूपैकी एक मानले जाते. भारताची २७ वर्षीय खेळाडू म्हणाली की, कुस्तीमधील अनुभवामुळे मी थायलंडच्या प्रतिस्पर्धी विरुद्ध फायद्यात असेन. फेयरटेक्स निश्चितपणे एक बळकट प्रतिस्पर्धी आहे, पण माझ्याकडे अशाप्रकारच्या कुस्तीचा अनुभव असून मागील सात वर्षांत मी खूप काही कमावले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …