ठळक बातम्या

एफएसडीएलचा ‘वनफुटबॉल’ शी करार

मुंबई – फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल)ने गुरुवारी जर्मन फुटबॉल मीडिया कंपनी ‘वनफुटबॉल’शी कराराची घोषणा केली. या अंतर्गत इंडियन सुपर लीग (आयएसएल)चे प्रसारण जगभरातील दोनशेहून अधिक देशांमध्ये केले जाणार आहे. फुटबॉलप्रेमी आता २०२१-२२ आयएसएल सत्रात थेट सामन्यांचे प्रक्षेपण आणि हायलाइट ‘वनफुटबॉल’ मंचावर पाहू शकतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘वनफुटबॉल’महिन्याला १० कोटींहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. वनफुटबॉल ॲप (आयओएस/अँड्रोइड, ॲपल एयरप्ले आणि गुगल क्रोमकास्ट)च्या माध्यमातून स्मार्टफोन आणि टॅबलेटवर सर्व थेट आणि मागणीनुसार सामने उपलब्ध असतील, तसेच डेस्कटॉपवरही ‘वनफुटबॉल’ संकेतस्थळावर सामन्यांचा आंनद लुटता येणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …