एनआयएला धक्का, सुधा भारद्वाज यांच्या जामीनाविरोधातील अर्ज फेटाळला

नवी दिल्ली – राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) सर्वोच्च न्यायालयात धक्का बसला आहे. सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनाविरोधात एनआयएने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही एनआयएची याचिका फेटाळून लावली. मागील तीन वर्षांपासून भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी आणि नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याच्या आरोपात सुधा भारद्वाज यांना एनआयएने अटक केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सुधा भारद्वाज यांना डिफॉल्ट बेल मंजूर केला. एनआयएने कायद्याने ठरवून दिलेल्या कालावधीत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. एनआयएने या जामीन अर्जाला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयात एनआयएच्या याचिकेवर न्यायाधीश यू. ललित, न्यायाधीश रवींद्र भट आणि न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीन निकालात हस्तक्षेप करण्यासाठी कोणतेही ठोस कारण नसल्याचे मत खंडपीठाने व्यक्त करत एनआयएची याचिका फेटाळून लावली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …