एटीके-एमबीने मुख्य प्रशिक्षक हबास यांना हटवले

कोलकाता – माजी चॅम्पियन एटीके मोहन बागानने शनिवारी आपले सर्वात यशस्वी प्रशिक्षक अँटोनियो लोजेप हबास यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. इंडियन सुपर लीग (आयएसएल)च्या सध्याच्या सत्रात खराब कामगिरीमुळे क्लबने हा निर्णय घेतला. हबास पहिले प्रशिक्षक आहेत, ज्यांनी आयएसएलमध्ये दोन वेळा जेतेपद संघासाठी जिंकवून दिले आहे. सध्याच्या आयपीएल सत्रात मागील चार सामन्यात स्टार खेळाडूंनी सुसज्ज संघ कोणताच विजय मिळवू शकला नाही, ज्यामुळे गुणतालिकेत ते खालच्या स्थानी आहेत. क्लबने आपल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, एटीके एमबीने अँटोनियो हबासला एटीके मोहन बागानच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मॅन्युअल कास्कालाना हंगामी प्रशिक्षक असतील. हबास यांनी २०१४ मध्ये एटलेटिको डि कोलकाताला सुरुवाती सत्राचे जेतेपद जिंकून दिले होते. हबास यांच्या मार्गदर्शनात एटीके पुढील सत्रात अंतिम चारमध्ये पोहचला होता. त्यानंतर २०१९ मध्ये दुसऱ्या कार्यकाळादरम्यान संघाला त्यांनी दुसरे जेतेपद जिंकून दिले. अशाप्रकारे ते एखाद्या क्लबला दोन चषक जिंकून देणारे पहिले मॅनेजर बनले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …