एटर्नल्सच्या प्रदर्शनाचा मुहुर्त ठरला


मार्व्हल स्टुडिओजने आपला बहुप्रतिक्षित चित्रपट एटर्नल्सच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 12 जानेवारी रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित केला जाणार आहे. मार्व्हल स्टुडिओने याविषयी सोशल मिडियाद्वारे माहिती दिली आहे .
ऑस्कर विजेता च्लोए झाओ या चित्रपटाचे सह लेखक आणि दिग्दर्शक आहेत. एटर्नल्सची कथा त्या अमर प्राण्यांवर आधारित आहे जे 7000 पेक्षा अधिक वर्षे पृथ्वीवर गुप्तपणे जीवन जगत आहेत. परंतु शत्रू पुन्हा दाखल झाल्यानंतर एटर्नल्स आपला ग्रह वाचवण्यासाठी एकजूट होतात. या चित्रपटात जेमा चान सरसीच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तर रिचर्ड मॅडन इक्कारिसच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. याशिवाय या चित्रपटात कुमॅल ननजियानीने किंगोची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात मार्व्हल सिनेमॅटीक युनिव्हर्सचा पहिला समलैंगिक हिरो फास्टोसच्या भूमिकेत ब्रायन टायरी हेन्री असेल. मार्व्हल स्टुडिओचा हा चित्रपट 12 जानेवारी रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर हिंदी, तमिळ, तेलगू , कन्नड , मल्याळम आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …