एखाद्या भूमिकेसाठी मी स्वत:चे डोके भादरेन असे कधी वाटले नव्हते – विशाल चौधरी


गेल्या तीन दशकांमध्ये टीव्ही मालिकांचे विषय आणि संकल्पनांना दिशा देण्यात ‘झी टीव्ही’ ही वाहिनी नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे. भारताची संस्कृती आणि इतिहासावर आपल्या कर्तृत्त्वाची अमिट छाप उमटविणाºया अनेक ऐतिहासिक व्यक्तींचे आणि राजघराण्यांचे रंजक चित्रण ‘झी टीव्ही’ वाहिनीने आपल्या मालिकांमध्ये केले असून, त्यांनी प्रेक्षकांवर भुरळ घातली होती. जोधा अकबर आणि झाँसी की रानी या मालिकांनंतर ‘झी टीव्ही’ वाहिनीने २०२१मधील टीव्हीच्या पडद्यावरील सर्वात भव्य ऐतिहासिक मालिका सादर केली आहे. ही नवी मालिका मराठा साम्राज्यातील एका कुशल प्रशासक आणि मुत्सद्दी राजकारणी असलेल्या पण आजवर दुर्लक्षित राहिलेल्या ‘काशीबाई बाजीराव बल्लाळ’

यांच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेचे प्रसारण अलीकडेच सुरू झाले असून, तिने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळविली आहे. यातील सर्वच व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असले, तरी लोकप्रिय कलाकार विशाल चौधरीने साकारलेल्या बाळाराव जोशी यांच्या भूमिकेची प्रेक्षकांनी प्रशंसा केली आहे.
या मालिकेत विशालने काशीबार्इंचे बंधू बाळाराव जोशी यांची भूमिका साकारली आहे. बाळाराव हे स्वभावत:च बंडखोर वृत्तीचे होते. किंबहुना त्यांनी आपल्या घरच्या श्रीमंती राहणीमानाचा त्याग करून आणि घरच्यांच्या विरोधाला न जुमानता छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधक असलेल्या ताराराणी यांची चाकरी पत्करली होती, पण त्यांचे काशीबाई

आणि आपल्या आईवर प्रेम असते. छोट्या पडद्यावर अशा बंडखोर बाळाराव जोशी यांची भूमिका अस्सलपणे साकारण्यासाठी विशालने प्रयत्नांमध्ये कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही. या व्यक्तिरेखेसाठी त्याने आवश्यक ती सर्व कौशल्ये शिकून घेतली असून, त्याला या भूमिकेसाठी आपल्या डोक्याचा चकोट करून घ्यावा लागला.
विशाल चौधरी म्हणाला, ‘मी मॉडेलिंगच्या क्षेत्रातून आलो असल्याने एखाद्या भूमिकेसाठी डोक्यावरचे सर्व केस कापून चकोट करण्याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. मला नेहमीच सशक्त भूमिका रंगवायला आवडतात आणि बाळाराव जोशी यांची व्यक्तिरेखा ही अशीच एक शक्तिशाली भूमिका आहे. ते स्वभावानेच बंडखोर वृत्तीचे होते, पण आपल्या

आवडत्या लोकांच्या पाठिशी ते नेहमीच भक्कमपणे उभे राहत. प्रथम जेव्हा या व्यक्तिरेखेसाठी माझी निवड करण्यात आली, तेव्हा डोक्याचा चकोट करावा की नाही, याबद्दल मी साशंक होतो, पण निर्मात्यांच्या टीमने या भूमिकेच्या अस्सलपणाची मला खात्री पटवून दिली. काशीबार्इंच्या जीवनातील बाळारावांचे स्थान किती महत्त्वाचे आहे, ते त्यांनी
मला पटवून दिले. त्यानंतर मी ही भूमिका स्वीकारली. मला ही संधी सोडायची नव्हती आणि या उत्कृष्ट मालिकेत भूमिका साकारण्याचा माझा निर्णय योग्यच होता, याची मला खात्री पटली आहे.’

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …