विवेक यांनी ट्वीट करत बॉलिवूडचं कटू सत्य सांगितलं आहे.
बॉलिवूडचे लोकप्रिय निर्माता विवेक रंजन अग्निहोत्री सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर बेधडकपणे ते त्यांचे मत मांडताना दिसतात. नुकतीच विवेक यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत विवेक यांनी बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर निशाणा साधला आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
विवेक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ‘बॉलीवूडची कहाणी, बॉलिवूड कशा प्रकारे काम करते हे समजण्यासाठी आता मी खूप वेळ घालवला आहे. तुम्ही जे पाहता ते बॉलिवूड नाही. खरं बॉलिवूड तर तुम्हाला तुमच्या सहकलाकारांमध्ये दिसेल. बॉलिवूडची आतली बाजु इतकी काळी आहे की ते सामान्य माणसाला समजून घेण कठीण आहे,’ असे विवेक त्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.