एक क्रूर हत्याकांड : १०० दिवसांत मारले गेले ८ लाख लोक

अलीकडच्या काही दिवसांत अफगाणिस्तानात दिसलेले दृश्य भयावह होते. तालिबानच्या भीतीने लोक विमानात चढून देश सोडण्याचा प्रयत्न करताना दिसले; पण तुम्हाला माहीत आहे का की, १९९४ मध्ये रवांडामध्ये असा रक्तरंजित खेळ खेळला गेला होता. ज्याबद्दल अनेकांना माहितीही नाही. सोशल मीडियावर या हत्याकांडातून वाचलेल्या एका महिलेने आता जाऊन संपूर्ण कहानी उघडली आहे. तिने सांगितले की, शंभर दिवसांत तेथे ८ लाखांहून अधिक लोक कसे मारले गेले. एवढेच नाही, तर या महिलेने आपल्या आई आणि लहान भावाचे शीर कापल्याचे डोळ्यांसमोर पाहिले होते.
१९९४ च्या हत्याकांडातून अँटोइनेट मुताबाजी बचावली; पण तिने जे पाहिले ते कल्पनेपलीकडचे होते. आता अँटोइनेटने त्या काळातील स्थिती कथन केली आहे. त्यावेळी सर्वांची हत्या कशी झाली, हे त्यांनी सांगितले. रस्ते मृतदेहांनी भरलेले होते. मृतदेह पुरण्याऐवजी कुत्र्यांना खायला घालण्यात आले. वाटेत तुम्हाला अनेक शिरच्छेद केलेले मृतदेह मिळायचे. हुतू अध्यक्ष जुवेनल हबयारीमाना यांना फाशी दिल्यानंतर या हत्याकांडाला सुरुवात झाली.

देशात झालेल्या हत्याकांडात शंभर दिवसांत सुमारे आठ लाख लोक मिलिशिया सैन्याने मारले. हे सर्व लोक तुत्सी नावाच्या अल्पसंख्याक गटातील होते. आपल्या कटू अनुभवाची आठवण करून देताना अँटोनेटने सांगितले की, तिच्यासमोर तिच्या कुटुंबातील सदस्यांचे गळे चिरले गेले होते. तिने स्वत:ला झाडाझुडपांमध्ये लपवून ठेवले, ज्यामुळे तिचा जीव वाचला; पण तिच्या कुटुंबातील सदस्यही सुटू शकले नाहीत. येथील एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, ज्या प्रकारे तिने तीन महिने लपून स्वत:ला वाचवले ते खूप कठीण होते. डोळ्यांसमोर तिला कुत्रे प्रेत खाताना दिसायचे.
अँटोइनेटच्या म्हणण्यानुसार, हे मारेकरी लोकांकडून पैसे उकळायचे. जर तुमच्याकडे पैसे नसतील, तर ते तुम्हाला गोळ्या घालायचे आणि तुमच्याकडे पैसे असले, तरी ते तुमच्यावर गोळ्या घालायचे. आता अँटोइनेट होलोकॉस्ट मेमोरियल डे ट्रस्टमध्ये सामील होऊन या हत्याकांडातून वाचलेल्यांसाठी काम करते. अशा लोकांना मदत करणाºया अनेक मोहिमा तिने चालवल्या आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …