नेटफ्लिक्सचा चित्रपट एक्स्ट्रेक्शन 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला दाखल होत आहे. या चित्रपटात थॉर स्टार क्रिस हेम्सवर्थ पुन्हा एकदा दिसून येणार आहे. खरेतर मागच्या भागात त्याला गोळी लागल्याचे दाखवण्यात आले होते. त्यामुळे तो मरण पावला असल्याचे प्रेक्षकांना वाटू लागले होते. परंतु आता या ऑस्ट्रेलियन ॲक्टरने सिक्वलमध्ये एंट्री केली आहे व तो टायलर रेकच्या रुपात दाखल होणार आहे.
क्रिसने स्वत: सोशल मिडियावर एक्स्ट्रेशन2 चा नवा लुक शेअर केला आहे. त्याने दोन फोटो शेअर केले आहेत. दोन्ही फोटोत तो बर्फाळ प्रदेशात दिसून येतोय. यापैकी एकात तो ट्रेनमध्ये चढताना दिसतोय तर दुसऱ्या फोटोत तो एका व्यक्तीबरोबर उभा असल्याचे पहायला मिळत आहे.
एक्स्ट्रेक्शन चित्रपटाची कथा बांग्लादेशाच्या ढाका राजधानीवर आधारित होती व त्याचे शूटींगही तेथेच करण्यात आले होते. नेटफ्लिक्सवर एक्स्ट्रेशनला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बर्ड बॉक्सचे व्ह्यूजचे रेकॉर्ड मोडीत काढले होते.