ठळक बातम्या

एका व्यक्तीने चर्चमध्ये एकाच वेळी केले ९ स्त्रियांशी लग्न

भारतात सध्या लग्नसराई सुरू झाली आहे. तुम्हाला सर्वत्र बँडचे सूर ऐकू येतील. भारतात विवाहसोहळा मोठ्या नियोजनाने केला जातो. त्याचा समाजातील दर्जाशी संबंध आहे. भारतात हिंदू धर्मात एक पत्नी असताना दुसरे लग्न करणे बेकायदेशीर आहे, पण नुकतेच एकाच मंडपात ९ महिलांशी लग्न करणारा एक माणूस चर्चेत आला आहे. या अनोख्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.
ब्राझीलमधील साओ पाऊलोमध्ये हा विचित्र विवाह सोहळा झाला. येथे आर्थरने एका चर्चमधील धर्मगुरूच्या उपस्थितीत ९ महिलांशी लग्न केले. फुकटच्या प्रेमासाठी ब्राझिलियन मॉडेलने हे केले. या लग्नापूर्वी आर्थरचे लग्न लुआना काझाकीशी झाले होते, तिच्यासोबत तो नुकताच हनीमूनहून परतला होता, पण हनीमूनहून परत आल्यानंतर या जोडप्याने ठरवले की, आर्थर इतर अनेक महिलांशीही लग्न करेल व त्यानेही तसेच केले. आर्थरने नुकतेच एकाच वेळी ९ महिलांशी लग्न केले.

आर्थर आणि त्याची पहिली पत्नी सामूहिक विवाहापूर्वीही चर्चेत राहिली आहे. काही काळापूर्वी हे कपल त्यांच्या हनीमूनच्या फोटोंमुळे चर्चेत आले होते. या जोडप्याने त्यांचा हनीमून फ्रान्समधील वादग्रस्त कॅप डी’एग्डे येथे साजरा केला. या ठिकाणी मॉल्समध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी लोक कपड्यांशिवाय फिरतात. या जोडप्याने त्यांचा नग्न हनीमूनही साजरा केला आणि त्याचे फोटो शेअर केले.
आर्थरच्या पहिल्या पत्नीला तिच्या नवºयाने केलेल्या या लग्नाबाबत कोणताही आक्षेप नाही. इतकेच नव्हे तर तिच्या नवºयाच्या या विवाहात तिने स्वत: हजेरी लावली होती. आर्थर म्हणतो की, प्रेम ही एक विनामूल्य गोष्ट आहे. ते शेअर केले पाहिजे. ते कोणापुरते मर्यादित नसावे. हे जोडपे अचानक प्रकाशझोतात आले, जेव्हा लॉकडाऊनदरम्यान त्यांनी ओन्लीफॅन्स या प्रौढ साइटवर खाते तयार करून लाखो कमावण्यास सुरुवात केली. या जोडप्याने आपण इतरांना सेक्ससाठी प्रेरित करून पैसे कमवत असल्याचा खुलासा केला होता. आता या लग्नामुळे ते पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …