एएफसी महिला आशियाई चषकासाठी भारताची २३ सदस्यीय टीम घोषित

नवी दिल्ली – यजमान भारताने एएफसी महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी २३ सदस्यीय टीमची घोषणा के ली आहे. या टीममध्ये गेल्या महिन्यात ढाका येथे अंडर-१९ सैफ चॅम्पियनशिपमध्ये उपविजेती ठरलेल्या टीमच्या चार खेळाडूंचा समावेश आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने कर्णधाराच्या नावाची घोषणा केलेली नाही, परंतु अनुभवी खेळाडू आशालता देवी यांना हा सन्मान दिला जाण्याची दाट शक्यता आहे. ही स्पर्धा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्रातील तीन स्थानांवर होणार आहे. आशिया खंडातील या सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेचे १९८० नंतर भारत पहिल्यांदाच यजमानपद सांभाळत आहे.
गेल्या महिन्यापासून कोच्चीतील शिबिरामध्ये सहभाग घेत असलेल्या २७ खेळाडूंमधूनच या २३ जणांची निवड करण्यात आली आहे. सैफ चॅम्पियनशिप खेळलेल्या ज्या चार खेळाडूंना टीममध्ये स्थान मिळाले आहे, त्यांच्यामध्ये हेमाम शिल्की देवी, एम. बालामुरूगन, सुमती कुमारी आणि एन. प्रियंका देवी यांचा समावेश आहे. अर्थात भारताला एसीएल (अँटीरियर क्रूसिएट लिगामेंट) शस्त्रक्रियेनंतर अद्याप पूर्णपणे तंदुरु स्त झाली नसलेल्या अनुभवी स्ट्रायकर बाला देवी यांची उणिव भासणार आहे. भारताला इराण (२० जानेवारी), तैपेई (२३ जानेवारी), चीन (२६ जानेवारी) यांच्यासोबतच्या गटात ठेवण्यात आले आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक थॉमस डेनेरबी म्हणाले की, आमच्याकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. युवा खेळाडू स्वत:ला सिद्ध करण्यासाठी उत्सुक आहेत आणि ते टीममध्ये जोश आणि निकोप स्पर्धा घेऊन येतील असे त्यांनी सांगितले. तर अनुभवी खेळाडूंकडून त्यांना (युवा खेळाडू) मैदानात आणि मैदानाबाहेर चांगले मार्गदर्शन लाभेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारतीय टीम : गोलकीपर : अदिती चौहान, एम. लिंथोइंगाम्बी देवी, सौम्या नारायणसामी
डिफेंडर : डालिमा छिब्बर, स्वीटी देवी, रितु रानी, एल आशालता देवी, मनीषा पन्नज्ञ, हेमम शिल्की देवी, संजू यादव
मिडफील्डर : युमनाम कमला देवी, अंजू तमांग, कार्तिका ए, एन. रतनबाला देवी, नाओरेम प्रियंका देवी, इंदुमती कार्तिरेसन
फॉरवर्ड : मनीषा कल्याण, ग्रेस दांगमेइ, प्यारी शाशा, रेणु, सुमती कुमारी, संध्या रंगनाथन, एम. बालामुरूगन.
मुख्य कोच : थॉमस डेनेरबी.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …