उर्फी जावेदने शेअर केला नवा व्हिडिओ


इंटरनेट सेंसेशन, बिग बॉस फेम अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मिडियावर चांगलीच ॲक्टीव्ह असते. ती नेहमी इंस्टाग्रामवर आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांकरिता शेअर करत असते. खरेतर हे देखील तितकेच सत्य आहे की ती आपल्या सर्व इंस्टाग्राम पोस्टवर ट्रोल होत असते. युजर्स तर अनेकदा तिला तिच्या छोट्या कपड्यांवरुन खडे बोल सुनावत असतात. परंतु बदलेल ती उर्फी कसली? त्यानंतरही उर्फी युजर्सना आपला हॉटनेस दाखवण्यात कोणतीही कसर सोडत नाही.
आता तिने इंस्टाग्रामवर एक डीआयवाय व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने स्टॉकिंग्जपासून टॉप कसा बनवायचा याचे धडे दिले आहेत. उर्फीने स्किन कलरचा मोजा घेऊन तो कैचीने कापला व त्याच्या पासून टॉप बनवला. त्यानंतर तो अंगात घालून दाखवून तिने कॅमेऱ्यासमोर पोझही दिली. उर्फीचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 93 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे व त्यावर तितक्याच कमेंट्सही झाल्या आहेत. उर्फीचा हा व्हिडिओ पाहून एका युजरने म्हटले आहे,’ हिचे कपडे दान करुन टाका.’ तर दुसऱ्या युजरने इतकी गरिबी असे कमेंट केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …