उर्फीच्या ट्रान्सफॉर्मेशनने चाहत्यांना झटका

आपल्या चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत राहणारी उर्फी आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे, परंतु यावेळेस ती आपल्या भयंकर आणि तोकड्या आऊटफिटमुळे नव्हे, तर संपूर्ण अंग झाकणाऱ्या कपड्यांमुळे चर्चेत आली आहे. उर्फीला ज्यांनी कुणी या अवतारात पाहिले ते सर्वच अचंबित झाले आहेत. उर्फीचा हा सूट घातलेला व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.
उर्फी आपल्या आऊटफिटमुळे नेहमीच लाइमलाइटमध्ये असते. ती नेहमी आपल्या नव्या लुक्ससह सोशल मीडियावर काही ना काही तरी पोस्ट करत असते, तर अनेकदा ती आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोलही होते. आता तिचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून तिच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. नव्या वर्षासोबत तिने आपला अवतारही बदलला आहे. या व्हिडीओत ती एका साध्या पंजाबी सूटमध्ये दिसून येतेयं. तिने लाल दुपट्ट्यासोबत फ्लोरल प्रिंट सूट घातला आहे. उर्फीच्या या अचानक बदललेल्या लूकने सोशल मीडियावर खूप खळबळ उडवून दिली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …