बीड – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी बीडमधील एका कट्टर शिवसैनिकाने तिरुपती बालाजीपर्यंत पदयात्रा काढली होती, पण या पदयात्रेदरम्यान त्या शिवसैनिकाचे निधन झाले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी सुमंत रुईकर हे त्यांच्या मित्रासह १ डिसेंबरला तिरुपती बालाजीकडे पायी निघाले होते. त्यांनी बीड ते तिरुपती असा ११०० किमी पायी चालत जाण्याचा निश्चय केला होता. ३१ डिसेंबरपर्यंत तिरुपतीला पोहचण्याचा त्यांचा संकल्प होता, पण तिरुपतीकडे जाताना सुमंत रुईकर यांना ताप आल्याने कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने रुईकर यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बीड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुमंत रुईकर यांनी यापूर्वी २०१९ मध्ये उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी बीड ते तिरुपती पायी यात्रा केली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुमंत रुईकर यांचे कौतुक करत सत्कार केला होता.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …