उत्पन्न वाढीसाठी उल्हासनगर महापालिका स्वत:च्या मालमत्तांवर लावणार मोबाइल टॉवर

उल्हासनगर – उल्हासनगर महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली असून, उत्पन्न वाढीच्या विविध मार्गांची चाचपणी महापालिका करत असताना, आता शहरातील महापालिकेच्या ताब्यात असलेल्या विविध मालमत्तांपैकी मोकळी मैदाने, समाज मंदिरे अशा वास्तूंच्या आवारात मोबाइल टॉवर उभारण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव नुकताच स्थायी समितीच्या पार पडलेल्या बैठकीत सादर करण्यात आला. महासभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर भविष्यात पालिकेच्या मालमत्तांच्या आवारात मोबाइल टॉवरचे जाळे पाहायला मिळणार आहे.
उल्हासनगर महापालिकेने उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याचे विविध माध्यमांतून केलेले प्रयत्न फोल ठरताना दिसत आहेत. त्यात मालमत्ता कर आणि इतर माध्यमातून मिळणारे उत्पन्नाचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी महापालिकेने विविध पर्यायांसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शहरातील खासगी इमारतींवर आणि खासगी भूखंडावर मोबाइल टॉवर उभारण्यासाठी महापालिका परवानगी देते; मात्र गेल्या काही काळात शहरातील धोकादायक इमारतींची संख्या वाढली असून, मोबाइल टॉवरचा भार धोकादायक इमारतींवर असल्याने इमारतांनी धोका उद्भवण्याच्या भीतीने अनेक इमारतींवरील मोबाइल टॉवर काढण्याचे आदेश महापालिकेने दिले होते. त्यामुळे मोबाइल टॉवर कंपन्यांची अडचण झाली होती. यावर पर्याय म्हणून मोबाइल कंपन्यांची सोय आणि महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. मोबाइल कंपन्यांचे टॉवर उभारण्याच्या माध्यमातून दर महिन्याला चांगला मोबदला मिळत असतो. त्यातून खासगी इमारतींच्या देखभाल, दुरुस्ती आणि इतर खर्च निघत असतो. त्यामुळे महापालिकेने आपल्या मालकीच्या मालमत्तांच्या जागांवर मोबाइल कंपन्यांच्या टॉवरला परवानगी देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी महापालिकेने शहरातील मोकळी मैदाने, समाजमंदिरे आणि इतर एकूण अशा १०५५ वास्तूंच्या ठिकाणी टॉवर उभारण्याबाबतचा प्रस्ताव नुकताच पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला आहे. त्यामुळे स्थायी समितीतही या प्रस्तावाला सदस्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …