उत्तर प्रदेश निवडणूक : राष्ट्रवादी व सपाची युतीबाबत बोलणी पूर्ण – नवाब मलिक

मुंबई – आगामी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची बोलणी जवळजवळ पूर्ण झाली आहे. आता उत्तर प्रदेशातील इतर लहान पक्षांसोबत समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव चर्चा करत आहेत. त्यानंतर युतीबाबत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

नबाव मलिक म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाची जवळजवळ युतीबाबत बोलणी पूर्ण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यात ही बोलणी सुरू आहे. उत्तर प्रदेशातील इतर लहान पक्षांसोबत अखिलेश यादव चर्चा करत असून, ही बोलणी झाल्यानंतर युतीबाबत घोषणा करण्यात येईल. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत चूक घडली होती का?, याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी सुरू आहे. मात्र, या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा हे काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी करत असतील, तर ते चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीअंती पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत चूक झाली होती का? किंवा या प्रकरणामध्ये केवळ राजकारण केले जाते, हे समोर येईल, असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …