ठळक बातम्या

ईशाच्या फोटोशूटमधील ‘त्या’ टॅटूने वेधले चाहत्यांचे लक्ष

बॉलीवूड ॲक्टर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल ही भलेही चित्रपटांमध्ये सक्रिय नसते, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या तसेच फॉलोअर्सच्या सातत्याने संपर्कात असते. फोटोंद्वारे ईशा आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता ईशाने एक असा फोटो शेअर केला आहे, जो चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. या फोटोतील ईशाचा लूक चांगलाच आकर्षक वाटत आहे. फोटोत ईशा खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

ईशाने फोटोत काळ्या रंगाचा स्पोर्ट्स ब्रा टॉप आणि एकदम सैलसर असा पायजमा घातला आहे, जो लो वेस्ट आहे. या फोटोशूटमध्ये ईशाच्या कंबरेवरचा टॅटू रिव्हील झाला आहे, ज्याकडे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे. अनेक चाहत्यांनी ईशाच्या या टॅटूचे कौतुक केले असून, तिच्या लूकला किलर म्हटले आहे. काही चाहत्यांनी म्हटले आहे, ‘धूमची आठवण झाली’. तर एका चाहत्याने लिहिले आहे, ‘धूम…धूम…आपण अजूनही धूममधील लूकसारख्याच दिसता.’ २००४ मध्ये आलेला धूम हा ईशाच्या करिअरमधील सर्वात महत्त्वाचा व हिट चित्रपट होता. या चित्रपटामध्ये पहिल्यांदा ईशा आपल्या इमेजच्या उलट स्टाइल स्टेटमेंटमध्ये दिसून आली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment