लंडन – मागील आठवड्यात कोरोना संसर्गामुळे दहा सामने स्थगित झाल्यानंतर प्रीमिअर लीग फुटबॉल क्लबने हे सत्र मध्यात न रोखण्याचा निर्णय घेतला. इटली व स्पेनच्या लीगमधील ९० टक्क्यांपेक्षा जास्त खेळाडूंनी दोन लस घेतल्या असून, प्रीमिअर लीगच्या मात्र ७७ टक्के खेळाडूंनीच लसीचे दोन डोस घेतले आहेत. लीगने हे देखील सांगितले की, १६ टक्के खेळाडूंनी लसीचा एक डोस ही घेतलेले नाहीत. मागील आठवड्यात लीगचे खेळाडू व स्टाफमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत तो आकडा ९० वर पोहचला. ब्रिटनमध्ये मागील चार पैकी तीन दिवस रोज ९० हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त होत आहेत. आठवड्याच्या शेवटी दहा पैकी सहा सामने रद्द झाल्यानंतर प्रीमिअर लीग क्लबने सोमवारी ऑनलाइन बैठक घेतली. लीग म्हणाले की, आम्हाला ठाऊक आहे की, अनेक क्लब कोरोना संसर्गाच्या आव्हानांचा सामना करत आहेत, पण लीगचा सामूहिक इरादा सध्याचे सत्र कायम राखणे आहे. सर्वांची सुरक्षा व आरोग्य आमची प्राथमिकता असेल. आम्ही मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करू. तसेच आम्ही सर्व खेळाडू व स्टाफला लसीकरण पूर्ण करण्यासाठी क्लबला सहकार्य करण्याची विनंती ही करत आहोत.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …