ईडी-सीबीआय प्रमुखांच्या कार्यकाळात ५ वर्षांची वाढ

केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली – केंद्र सरकारने रविवारी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) या तपास संस्थांच्या प्रमुखांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला. आतापर्यंत दोन्ही तपास संस्थांच्या संचालकांची नियुक्ती दोन वर्षांच्या ठराविक कालावधीसाठी केली जात होती. सध्या सुबोध जैस्वाल सीबीआयचे प्रमुख आणि संजय कुमार मिश्रा ईडीचे प्रमुख आहेत. नवीन अध्यादेशानुसार सीबीआय आणि ईडी प्रमुखांची नियुक्ती पहिल्या दोन वर्षांसाठी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना तीन वर्षांसाठी (१+१+१) मुदतवाढ दिली जाईल. प्रत्येकी एक वर्षासाठी तीनवेळा मुदतवाढ दिली जाऊ शकते; मात्र ती एकूण पाच वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, २०१८ मध्ये जारी करण्यात आलेल्या नियुक्ती आदेशात बदल करून केंद्र सरकारने ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला होता. मिश्रा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२० मध्ये संपला होता, परंतु त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. १९९७ पूर्वी सीबीआय संचालकांचा कार्यकाळ निश्चित नव्हता आणि सरकार त्यांची कधीही बदली करू शकत होते; मात्र सर्वोच्च न्यायालयाने विनीत नारायण यांच्या निकालात सीबीआय संचालकांना स्वतंत्रपणे काम करण्याची परवानगी देण्यासाठी किमान दोन वर्षांचा कार्यकाळ निश्चित केला होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …