इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी होणार – नितीन गडकरी

  • – प्रदूषण कमी कण्याचे उद्दिष्ट
  •  चार्जिंग पॉइंट उभारण्यासाठी परवानगी

नवी दिल्ली – इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढावी यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. ‘फेम’ योजनेंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीवर सबसीडी दिली जात आहे; मात्र तरी देखील या वाहनांची किंमत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे ग्राहकांचा ओढा कमी असल्याचे दिसून येते. आता सरकारने इलेक्ट्रिक वाहनांचा उत्पादन खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला असून, येत्या दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहने देखील पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या किमतीमध्ये उपलब्ध होणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडीकरी म्हणाले. ते सस्टेनेबिलिटी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित वेबिनारमध्ये बोलत होते.

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, ज्या लोकांना इलेक्ट्रिक वाहन खरेदीची इच्छा आहे; मात्र जादा किमतीमुळे खरेदी करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. येत्या दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची किंमत आणखी कमी होणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवून प्रदूषणाला आळा घालण्याचे सरकारचे धोरण आहे. इलेक्ट्रिक वाहनांवर सुरुवातीपासून केवळ ५ टक्केच जीएसटी आकारला जातो आणि आता लिथियम बॅटरीचा निर्मिती खर्च कशा पद्धतीने कमी करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पेट्रोल पंपांना यापूर्वीच चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. येत्या वर्षभरात संपूर्ण भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेले चार्जिंग स्टेशन निर्माण होतील. सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा महत्त्वाचा पार्ट असणाऱ्या लिथियम बॅटरीचा निर्मिती खर्च अधिक आहे, तो कशा पद्धतीने कमी करता येईल यावर काम सुरू आहे. स्थानिक लेव्हलवर जास्तीत जास्त बॅटरीचे उत्पादन व्हावे यासाठी प्रोहत्साहन देण्यात येत आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.

  • चार्जिंग पॉइंट उभारण्यासाठी परवानगी

इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी मोठ्या प्रमाणात चार्जिंग पॉइंटची आवश्यकता असणार आहे, हे लक्षात घेऊन देशात चार्जिंग पॉइंट उभारण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. पेट्रोल पंपांना चार्जिंग पॉइंट उभारण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्यात आल्या आहेत. इलेट्रिक वाहनांची संख्या वाढल्यास देशातील प्रदूषणाचा स्थर निश्चितपणे कमी होईल, असा विश्वासही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …