ठळक बातम्या

इन्स्टावर ठेवलेल्या स्टेटसमुळे १७ वर्षीय मुलाची केली हत्या

पुणे – एखाद्याला इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवणे किती महागात पडू शकते, याच ज्वलंत उदाहरण पुण्यात पाहायला मिळाले आहे. दशांत नावाच्या १७ वर्षीय मुलाने ‘३०२ शंभर टक्के’ असे लिहिलेले आणि त्यासोबत पिस्तूलाचा इमोजी, अशा आशयाच स्टेटस ठेऊन ते केवळ सख्खा चुलत भाऊ आणि त्याच्या मित्रालाच दिसेल अशी सेटिंग केली होती, असे सांगण्यात आले आहे. त्यावरून तो आपल्याला मारून टाकले या भीतीने स्टेटस ठेवणाऱ्या १७ वर्षीय चुलत भावाची दोघांनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील तळेगावमध्ये घडली असून, दशांत परदेशी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश लोहार आणि दशांतचा चुलत भाऊ कमलेश परदेशी या दोघांना तळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशांतने चुलत भाऊ कमलेश आणि मित्र प्रकाशला काही महिन्यांपूर्वी बांबूने मारहाण केली होती. त्यानंतर, हे प्रकरण मिटले असे वाटत असताना दशांतने ३०२ शंभर टक्के अन् पिस्तूलाचा इमोजी, असे इन्स्टावर स्टेटस ठेवले होते. विशेष म्हणजे ते प्रकाश आणि कमलेशलाच दिसेल अशी सेटिंग केली होती. त्यामुळे दशांत आपल्याला जीवानिशी मारणार असल्याची भीती या दोघांच्या मनात होती. त्यामुळे बुधवारी दशांतचा चुलत भाऊ कमलेश हा फोन करून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्यांना दशांतला अज्ञात स्थळी बोलावून मारायचे होते, पण तो कमलेशी जास्त काही न बोलता फोन ठेवून द्यायचा. अखेर, कमलेशने प्रकाशला फोन करण्यास सांगितला. त्यानंतर दशांतने प्रकाशचा फोन उचलला असता, तू फोटो छान काढतोस माझे फोटो काढायचे आहेत असे म्हणून दशांतला हेवी नॅशनल कंपनी परिसरात बोलावले गेले. तिथे दशांत येण्यापूर्वी त्याचा खून कसा करायचा याचे त्यांनी नियोजन केले. दशांत आल्यानंतर चुलत भाऊ कमलेशचा फोटो काढण्यास त्याला सांगितले गेले. यानंतर दशांतने खाली बसून फोटो काढण्याची पोज घेतली, दरम्यान, तेव्हाच त्याच्या पाठीमागून प्रकाश लोहारने त्याचा डोक्यात हातोडीने घाव घातला. यामुळे दशांत जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतरही कमलेशने दशांतवर पुन्हा हातोडीचे घाव घातले आणि त्याची हत्या केली.
दुसरीकडे दशांतचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. त्यांना त्याचा मृतदेह हा हेवी नॅशनल कंपनी परिसरात आढळला व त्यानंतर एकच खळबळ उडाली. तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले अन् तपासाची चक्रे फिरवली. शोध सुरू झाला, तेव्हाच ज्या ज्या ठिकाणी पोलीस जात होते तिथे आरोपी प्रकाश लोहार हा उपस्थित असायचा. याचा संशय पोलिसांना आला, पोलिसांनी केवळ संशयाच्या धाग्यावर त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि तो घाबरला. त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले तिथे बऱ्याच वेळ प्रकाशने उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र, अखेर त्याने दशांतचा चुलत भाऊ कमलेशसह खून केल्याचे सांगितले. त्यानंतर तातडीने कमलेशला देखील अटक करण्यात आली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …