इन्स्टावरील ओळख पुणेकर महिलेला पडली महागात; १० लाखांचा गंडा

पुणे – सोशल मीडियावरील फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर येत आहे. येथील एका महिलेला इन्स्टाग्रामवरील तरुणाने चक्क १० लाख रुपयांचा गंडा घातला. परदेशातून पाठवलेले गिफ्ट सोडवून घेण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेची तब्बल सव्वादहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

४७ वर्षीय महिलेशी इन्स्टाग्रामवर ओळख करून अनोळखी व्यक्तीने तिला ऑनलाईन लुटले. परदेशातून पाठवलेले गिफ्ट सोडवून घेण्यासाठी तब्बल सव्वादहा लाख रुपयांची फसवणूक केली. पीडित महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. २ ते २९ एप्रिल २०२१ दरम्यान ही घटना घडली होती. आरोपीने परदेशात पायलट असून, भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले होते; मात्र आपली फसवणूक होत असल्याची जाणीव झाल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. याआधी, आयटी अभियंता असलेल्या महिलेला टिंडर या डेटिंग ॲपवर झालेली ओळख चांगलीच महागात पडल्याचा प्रकार समोर आला होता. लग्नाचे आमिष दाखवून महिलेची ७३ लाख ५९ हजार ५३० रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी पीडित ३५ वर्षीय आयटी अभियंता महिलेने पुण्यातील वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …