इजिप्तचा राजा फराओच्या भव्य मंदिराचे जुने अवशेष सापडले

काहिरा – पिरॅमिडचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इजिप्तमध्ये पुरातत्व शास्त्रज्ञांना राजा फराओच्या भव्य मंदिराचे २,४०० वर्षे जुने अवशेष सापडले आहेत. या अवशेषांमध्ये अनेक कोरीव दगड आहेत. ज्यावर रहस्यमय शिलालेख घडविले आहेत. इजिप्शियन आणि जर्मन तज्ज्ञांच्या पथकाने हा शोध लावला आहे. हे अवशेष हेलीपोलिस येथील मतरिया भागात सापडले आहेत. प्राचीन काळी मतराया हा हेलीपोलिसचा एक भाग होता. हे कोरीव दगड आणि तुकडे बेसाल्टचे बनले असून, ते पश्चिम-उत्तर आघाडीच्या राजा नेक्टानेबोच्या मंदिराचे असल्याचे मानले जात आहे. राजा नेक्टानेबो (प्रथम) याने प्राचीन इजिप्तमधील शेवटच्या राजवंशाची स्थापना इसवी सनपूर्व चौथ्या शतकात केली. या भागाच्या पूर्वेला नाईल नदी वाहते. इजिप्तच्या पुरातत्व विभागाचं म्हणणं आहे की, हे कोरीव दगड राजा नेक्टानेबोच्या कारकिर्दीतील १३व्या आणि १४व्या शतकातील आहेत.
हा काळ सुमारे ३६७-३६६ इसवी सन पूर्वचा आहे. याचा शोध लावणाऱ्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, असे अनेक दगड सापडले आहेत. ज्यांची पूर्ण शिल्पे झालेली नाहीत. एवढंच नाही, तर राजाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर कोणतंही अतिरिक्त काम करण्यात आलं नाही. या टीमला लंगूरची मूर्तीही सापडलीय. याशिवाय भगवान शू आणि देवी तेफनट यांची समाधीही सापडलीय. हे राजा पसामतिक दुसरा यानं बांधलं होतं. राजा पसामतिक दुसरा यानं ५९५ ते ५८९च्या दरम्यान राज्य केलं. राजा नेक्टानेबो क यानं त्याच्या कारकिर्दीचा बराचसा काळ अचाइमेनिड साम्राज्याशी युद्धात घालवला. अचाइमेनिड साम्राज्याचं शासक पर्शियाचं होतं आणि त्यांना इजिप्त काबीज करायचं होतं. राजा नेक्टानेबो यानं त्याच्या राज्यात अनेक मंदिरं आणि बांधकाम प्रकल्प पूर्ण केले आहेत.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …