नाशिक – नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील एका शाळेतील १५ विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. शाळेतील १५ विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरीतील मुंढेगाव येथील आश्रमशाळेतील १५ विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या आश्रमशाळेत तीनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याला काही दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यानंतर त्याची कोविड चाचणी केली. या कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर इतरही विद्यार्थ्यांची कोविड चाचणी करण्यात आली. या चाचणीत एकूण १५ विद्यार्थ्यांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधित विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. आता प्रशासनाकडून आश्रमशाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांसह इतर ३४० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळेत काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचीही कोविड चाचणी करण्यात आली आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …