ठळक बातम्या

इंदिरा गांधी नारीशक्तीचे उत्तम उदाहरण – राहुल गांधी

नवी दिल्ली – दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना यांच्या पुण्यतिथी निमित्त देशभरातून आदरांजली वाहिली गेली. काँग्रेसनेही रविवारी त्यांना आदरांजली वाहिली. ‘माझ्या आजीने अखेरच्या क्षणापर्यंत निर्भयपणे देशाची सेवा केली – त्यांचे जीवन आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. नारीशक्तीचे उत्तम उदाहरण असलेल्या इंदिरा गांधींना त्यांच्या हौतात्म्यदिनानिमित्त विनम्र आदरांजली, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. १९८४ मध्ये आजच्या दिवशी म्हणजे३१ ऑक्टोबरला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या दोन अंगरक्षकांनी हत्या केली होती.
काँग्रेसनेही ट्विट करून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींना आदरांजली वाहिली. इंदिरा गांधींनी देशासाठी मोठे योगदान दिले. त्यांनी शक्तीचे प्रतिनिधित्व केले. त्या त्यागाचे प्रतीक आहेत, असं काँग्रेसने म्हटलं आहे. इंदिरा गांधींनी सेवेचे प्रतिनिधित्व केले. भारताच्या आयर्न लेडी, आपल्या पहिल्या महिला पंतप्रधान, खऱ्या भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment

  1. Pingback: trage mac