इंडोनेशिया ओपन : सिंधू सेमीफायनलमध्ये

सात्विक-चिरागही पुढील फेरीत
बाली – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने एक डाव गमावल्यानंतर पुनरागमन करीत दक्षिण कोरियाची सिम युजिनला हरवून इंडोनेशिया ओपन सुपर १००० बॅडमिंटन टूर्नामेंटच्या सेमीफायनल (उपांत्य फेरी)मध्ये प्रवेश केला, तर सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीतील जोडीने मलेशियाच्या गोह जे फेई आणि नूर इजुद्दीन यांना सरळ डावात २१-१९,२१-१९ असे पराभूत करून टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये स्थान मिळविले. त्यामुळे भारतीय टीमसाठी हा दिवस शानदार ठरला. सध्याची विश्व विजेत्यांमध्ये तिसरी क्रमवारी मिळविलेल्या सिंधूने युजिनला उपांत्यपूर्व फेरीत एक तास आणि सहा मिनिटांमध्ये १४-२१ २१-२१ २१-१४ असे पराभूत केले. आता सिंधूचा मुकाबला दुसऱ्या स्थानावरील थायलंडची इंतानोन रेचानोक हिच्याशी होणार आहे. इंतानोन रेचानोकने ८५०००० अमेरिकन डॉलर्स इतकी पुरस्कार रक्कम असलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फे रीमध्ये जपानची असुका ताकाहाशी हिला २१-१७ २१-१२ असे पराभूत केले.
भारताचा के बी साइ प्रणित पुरुष एके री उपांत्यपूर्व फेरीत ऑलिम्पिक विजेता आणि माजी जागतिक क्रमांक एकचा खेळाडू डेन्मार्कचा व्हिक्टर ॲक्सेलसनशी खेळेल. जागतिक क्रमवारीमध्ये १६ व्या स्थानावर असलेल्या प्रणीतने फ्रान्सचा ७० व्या स्थानावरील क्रिस्टो पोपोव्ह याला को २१-१७ १४-२१, २१-१९ ने हरविले. सिंधूसाठी युजिनविरोधातील सामना सोपा नव्हता. तिने एका वेळी ७-१ची आघाडी घेतली, परंतु युजिनने सलग सहा अंक मिळवून पुनरागमन केले आणि मध्यंतरापर्यंत ११-१० ची आघाडी घेतली. तिने ही गती कायम राखत पहिला डाव जिंकला. दुसऱ्या डावातही सुरुवात आक्रमक झाली, परंतु सिंधूने आपल्या स्टोक्सवर नियंत्रण ठेवून खेळी केली. आपल्या दीर्घ अनुभवाच्या आधारावर सिंधूने हा डाव जिंकला. निर्णायक डावात सिंधूने युजिनला संधी दिली नाही. सात्विक आणि चिराग या जोडीने पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत ४३ मिनिटांमध्ये मलेशियन जोडीला (गोह जे फेई आणि नूर इजुद्दीन) पराभवाची धुळ चाखायला लावली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …