इंडोनेशिया ओपन – सिंधू संघर्षपूर्ण विजयाने दुसऱ्या फेरीत

बाली – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने बुधवारी येथे इंडोनेशिया ओपन सुपर १००० बॅडमिंटन स्पर्धेच्या सुरुवाती फेरीत जपानच्या अया ओहोरीविरुद्ध तीन गेमपर्यंत चाललेल्या संघर्षपूर्ण सामन्यात विजय नोंदवला. सध्याची विश्व चॅम्पियन सिंधूने पहिला गेम गमावल्यानंतर चांगले पुनरागमन केले व एक तास १० मिनिटापर्यंत चाललेल्या सामन्यात ओहोरीचा १७-२१, २१-१७, २१-१७ असा पराभव करत प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. या विजयासह सिंधूने जपानी खेळाडूविरुद्ध आपल्या प्रभावशाली विक्रमाला ११-० वर पोहचवले. मागील आठवड्यात येथे जपानच्या अकाने यामागुचीकडून सरळ सेटमध्ये पराभूत झाल्यानंतर सेमिफायनलमधून बाहेर होणारी जगातील सातव्या क्रमांकाच्या सिंधूला पुढील फेरीत जर्मनीच्या २३ वर्षीय शटलर यवोन लीचा सामना करायचा आहे. तिसरे नामांकन प्राप्त भारतीय व जगातील २६ व्या क्रमांकाची खेळाडू लीसोबत तिचा पहिला सामना असेल. या काळात एन. सिक्की रेड्डी व ध्रुव कपिला या मिश्र दुहेरी जोडीला क्योहेई यामाशिता व नारू शिनोया या जपानच्या जोडीकडून ७-२१, १२-२१ असा पराभव पत्कारावा लागला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …