इंडोनेशिया ओपन – सिंधू पुन्हा सेमिफायनलमध्ये पराभूत

बाली – दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेता पी. व्ही. सिंधूला इंडोनेशिया ओपन सुपर १००० स्पर्धेच्या सेमिफायनलमध्ये माजी विश्व चॅम्पियन थायलंडच्या रेचानोक इंतानोनकडून पराभवाचा धक्का बसला. तिसरे मानांकन प्राप्त सिंधूला जगातील आठव्या क्रमांकाची खेळाडू रेचानोकने ५४ मिनिटांत १५-२१, ३१-९, २१-१४ असे पराभूत केले. हा सलग तिसऱ्यांदा सिंधूचा सेमिफायनलमधील पराभव आहे. ती मागील आठवड्यात इंडोनेशिया मास्टर्स व ऑक्टोबरमध्ये फ्रेंच ओपनच्या सेमिफायनलमध्ये पराभूत झाली होती. जगातील सातव्या क्रमांकाची खेळाडू सिंधूचा रेचानोकविरुद्ध या सामन्याआधी रेकॉर्ड ४-६ असा होता. ती मागील दोन सामन्यात तिच्याकडून पराभूत झाली आहे. सिंधूने चांगली सुरुवात करताना लवकरच ८-३ अशी आघाडी मिळवली. रेचानोकने हे अंतर ९-१० असे केले व ब्रेकपर्यंत सिंधूकडे एक गुणांची आघाडी होती. ब्रेकनंतर सिंधूने सलग तीन गुण मिळवले व रेचानोकला संधी न देता पहिला गेम जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये रेचानोकने ब्रेकपर्यंत ११-७ अशी आघाडी मिळवली. पुढील दहा पैकी नऊ गुण तिने आपल्या नावे करत दुसरा गेम रेचानोकने जिंकला. तिसऱ्या व महत्त्वाच्या सेटमध्ये सिंधूने असंख्य चुका केल्या, ज्याचा थायलंडच्या खेळाडूने फायदा घेतला. सिंधू मागील वेळी अखेरीस स्विस ओपनच्या फायनलमध्ये पोहचली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …