बाली – शीर्ष भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने गुरुवारी येथे जर्मनीची युवोने लि हिच्यावर सरळ सामन्यात सहजगत्या विजय मिळवून इंडोनेशिया ओपन सुपर १००० बॅडमिंटन टूर्नामेंटच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत दमदार प्रवेश केला. सध्याची जागतिक विजेती आणि क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या सिंधूला या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात फारसे परिश्रम घ्यावे लागले नाहीत. तिने ८,५०,००० अमेरिकन डॉलर्सच्या पुरस्कार रकमेच्या या स्पर्धेत जगातील २६ व्या क्रमांकावरील खेळाडू असलेल्या युवोने लि हिला ३७ मिनिटांत २१-१२, २१-१८ अशी मात दिली. युवोने लि हिच्यासोबत प्रथमच खेळत असलेली जगातील सातव्या क्रमांकाची बॅडमिंटनपटू असलेल्या सिंधूने सुरुवातीपासूनच नियंत्रित खेळीचे दर्शन घडविले. दोन वेळा ऑलिम्पिक पदकाची विजेती ठरलेल्या सिंधूचा दबदबा असा होता की तिने पहिला डाव सहज आपल्या नावावर केला. या डावामध्ये सिंधूने सात अंक मिळविले. दुसऱ्या डावात मात्र युवोने लि हिने चांगल्या पुनरागमनाचा प्रयत्न केला. त्यामुळे हा डाव बरोबरीच्या झुंजीचा ठरला, परंतु सिंधूने युवोने लि हिला या परिस्थितीचा लाभ उठविण्याची संधी दिली नाही आणि सामना जिंकला. सिंधूचा मुकाबला आता उपांत्यपूर्व फेरीत स्पेनची बिट्रिज कोरालेस आणि दक्षिण कोरियाची सिम युजिन यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या फेरीतील सामन्याच्या विजेतीशी होणार आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …