इंडोनेशियातील मच्छीमारांना सापडला ७०० वर्षे जुना मौल्यवान खजिना

जकार्ता – शतकानुशतके दक्षिणपूर्व आशियातील इंडोनेशिया हा देश भारतीय संस्कृतीचा विस्तार मानला जातो. सुमात्रा बेटावर सातव्या ते १३व्या शतकापर्यंत श्रीविजय राजवंशाचे राज्य होते. पेलांगबांग याला या राजवंशाचे सुवर्ण बेट म्हटले जात असे. भारतीय चोल राजांनी येथे आक्रमण करून मौल्यवान खजिना लुटला आणि श्रीविजय वंशातील राजांना ओलीस ठेवले.
परत येताना हा खजिना गायब झाला. धोकादायक मगरींनी भरलेल्या पेलांगबांगच्या मुसी नदीत लोक त्याचा शोध घेत राहिले. आता जवळपास ७०० वर्षांनंतर मच्छीमारांना हा मौल्यवान खजिना सापडला आहे. सागरी संशोधक डॉ. शॉन किंग्सले यांच्या मते, सुमात्राच्या हरवलेल्या गोल्डन बेटाचा हा शोध आहे.

इतिहासकारांच्या मते, सुमात्रा येथील श्रीविजय राजघराण्याने १३व्या शतकापर्यंत दक्षिणपूर्व आशियातील बेटांवर राज्य केले. सागरी शक्ती असल्याने तिचा प्रसार भारताच्या पूर्व किनारपट्टी आणि दक्षिण चीन महासागरापर्यंत होता. पूर्वी येथे सापडलेली भारतीय आणि चिनी नाणी याचा पुरावा आहेत. आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात श्रीविजय घराण्याची छत्री होती. येथे बौद्ध आणि हिंदू धर्माच्या मूर्तीही सापडल्या आहेत. पुढे हा राजवंश जावाच्या मलायूपुरता मर्यादित राहिला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …