इंडिया ओपन : चालिहाने कोसेत्सकायाला हरवले

सिंधू आणि श्रीकांतही दुसऱ्या फेरीत
नवी दिल्ली – युवा बॅडमिंटनपटू अष्मिता चालिहा हिने स्पर्धेतील पहिला पलटवार करीत मंगळवारी येथे पाचव्या स्थानावरील येवगेनिया कोसेत्सकाया हिला हरवले, तर अव्वल स्थानावरील पी. व्ही सिंधू ही देखील इंडिया ओपनच्या महिला एकेरी स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत स्थान मिळविण्यात यशस्वी झाली. सध्याचा विश्व विजेता लो कीन यू आणि भारताचा किदाम्बी श्रीकांत हे देखील दुसऱ्या फेरीत दाखल झाले. लो कीन यूने कॅनडाच्या शियाओडोंग शेंगला १६-२१, २१-४,आणि २१-३ ने हरवले तर किदाम्बी श्रीकांतने माजी ज्युनिअर जागतिक स्तरावरील क्रमांक एकचा खेळाडू सिरिल वर्मावर २१.१७, २१ . १० ने मात केली. कोणत्याही स्थानावर नसलेल्या अष्मिता चालिहाने जगातील २८ व्या क्रमांकावरील रशियाची खेळाडू येवगेनिया कोसेत्सकाया हिला पहिल्या फेरीच्या तुलनेत अवघ्या ३१ मिनिटांत २४-२२, २१-१६ ने पराभूत केले, तर दोनवेळा ऑलिम्पिक पदक विजेती ठरलेल्या पी. व्ही. सिंधूने आपल्याच देशातील श्री कृष्णा प्रिया कुद्रावली हिच्यावर २१-५, २१-१६ ने मात केली. चिराग सेनला मात्र पुरुष एकेरी स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच मलेशियाच्या सूंग जू वेनविरुद्ध ८-२१,७-२१ने पराभव स्वीकारावा लागला.
अष्मिता चालिहाने येवगेनियाविरोधात शानदार खेळीला सुरुवात करीत पहिल्याच डावात आपल्या दमदार स्मॅशने ११-५ ची आघाडी घेतली. तिने सहज खेळीचे प्रदर्शन केले. ब्रेकनंतर अष्मिताने मोठी चूक केली होती. त्याचा लाभ उठवत येवगेनियाने गुणसंख्या १४-१४ केली. येवगेनियाने १६-१९ या गुणसंख्येवर पिछाडीवर गेल्यानंतर पुन्हा एकदा दमदार पुनरामगन करीत गेम पॉइंट मिळविला. चालिहाने त्यानंतर मात्र तिला चुका करण्यास भाग पाडले. चालिहाने आणखी दोन गेम पॉइंट वाचवत पुन्हा एकदा स्मॅशच्या साह्याने डाव जिंकला. दुसऱ्या डावातही तिने आधीच्याच खेळीची पुनरावृत्ती केली. चालिहाने ११-४ ची आघाडी घेतली. परंतु, येवगेनियानेही शिताफीने खेळी करीत गुणसंख्या १६-१९ के ली. मात्र, चालिहाने यावेळी अधिक नियंत्रित खेळी करतानाच दबावातही धीर कायम ठेवत डाव आणि सामना जिंकला. चालिहाचा मुकाबला आता फ्रान्सची येले होयॉक्स हिच्याशी होईल. येले होयॉक्सने भारताची रिया मुखर्जीला २१-१४, २१-१३ ने पराभूत केले. पी. व्ही. सिंधूचा मुकाबला आगामी फेरीत मिस्रची हेनी दोहा आणि भारताची इरा शर्मा यांच्यात होणाऱ्या सामन्यातील विजेत्याशी होणार आहे तर किदाम्बी श्रीकांतचा सामना डेन्मार्क च्या किम ब्रूनशी होईल. किम ब्रूनने भारताच्या शुभंकर डेला २१.१९, १८.२१, २१. १४ ने पराभूत केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …