इंडस्ट्रीपासून दूर राहण्याबाबत सोहाने केला खुलासा

अभिनयापासून तब्बल सहा वर्षे दूर राहिल्यानंतर आता अभिनेत्री सोहा अली खान कौन बनेगा शिखरवतीद्वारे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दाखल झाली आहे. सोहाच्या म्हणण्यानुसार तिला अभिनय जगतामध्ये परत यायचे आहे. आपण सध्या एक आई आणि अभिनेत्री या दोन्ही भूमिका खूप उत्तम प्रकारे साकारू शकतो, याची आपल्याला जाणीव झाली असल्याचे सोहाचे म्हणणे आहे.
सोहा पुढे म्हणाली, ‘नेहमी लोक मला विचारायचे की, मी बाहेर का जात नाही?, काम का करत नाही?, दुसरे पुस्तक का लिहित नाही?, परंतु जेव्हा लॉकडाऊन लागले, तेव्हा मी खूप खूश झाले, कारण मला या सर्व लोकांना उत्तरे द्यावी लागत नव्हती. खरेतर काही काळानंतर हळूहळू सर्व गोष्टी पूर्ववत होत गेल्या, परंतु त्यावेळी मला कौन बनेगा शिखरवतीची ऑफर आली. ती देखील तेव्हा जेव्हा कोरोना वाढला होता, परंतु आम्ही राजस्थानमध्ये एक बायो बबल बनवण्यात आणि तेथे शूटिंग करण्यात यशस्वी ठरलो.

इतकी वर्षे अभिनयातून आपण ब्रेक का घेतला होता, त्यावर बोलताना सोहा म्हणाली, ‘कुणाल चोवीस तास शूटिंग करत आहे. त्यामुळे मुलांबरोबर आई-वडिलांपैकी कुणी एकाने थांबणे गरजेचे होते. त्यामुळे मी अनेक ऑफर नाकारल्या, कारण त्यावेळेस माझ्या मुलीला माझी गरज होती, परंतु आता ती स्वावलंबी बनत आहे. त्यामुळे मला वाटते की, आता मी माझ्या करिअरवर लक्ष देऊ शकते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …