- युवेंट्सलाही पराभवाचा धक्का
मिलान – गतविजेता इंटर मिलानने वेनेजियाचा २-० असा पराभव करत सिरी ‘ए’ फुटबॉल स्पर्धेतील अव्वल दोन संघांवरील दबाव कायम राखला. इंटरसाठी हकान कालहानोग्लुने पहिल्या हाफमध्ये गोल केला, तर लोटारो मार्टिनेजने अखेरच्या काळात पेनल्टीवर गोल करत आपल्या संघाचा विजय सुनिश्चित केला. तिसऱ्या स्थानी असलेल्या इंटरचे एसी मिलान व नेपोलीपासून फक्त एक गुण कमी आहे, पण हे दोन्ही संघ त्यांच्यापेक्षा एक सामना कमी खेळलेत. नेपोलीला लाजियो, तर मिलानना सासुओलोचे आयोजन करायचे आहे. युवेंट्सची खराब कामगिरी कायम राहिली व त्यांना आपल्या खेळपट्टीवर अटलांचाविरुद्ध १-० असा पराभवाचा सामना झेलावा लागला. या सामन्यादरम्यान संघाला आपल्या चाहत्यांच्या हूटिंगचा सामना देखील करावा लागला. एंपोलीने अखेरच्या काळात दोन गोल करत फायोरेंटिनाचा २-१ असा तर सेंपडोरियाने पिछाडीवर पडल्यानंतर हेलास वेरोनाचा ३-१ असा पराभव केला.