नवी दिल्ली – सरत्या वर्षात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या भारतीय व्यक्तिमत्वांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. मागील वर्षाचा अपवाद वगळता वर्ष २०१७ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत अव्वल स्थानावर आहेत. मागील वर्षी बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल अनेकांनी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.
याहू इअर इन रिव्ह्यूमध्ये नेटकºयांनी सर्वाधिक सर्च केलेली बातमी, व्यक्तिमत्वे, विविध कार्यक्रम आणि बातम्यांमध्ये चर्चेत असणाºया व्यक्तिमत्वाबद्दल आढावा घेतला जातो. या यादीमध्ये दुसºया क्रमांकावर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आहे, तर तिसºया स्थानावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर देशाच्या राजकीय पटलावर अधिक ठळकपणे त्यांची दखल घेतली जाऊ लागली.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …