इंग्लंडच्या नजरा सेमिफायनलवर, श्रीलंका करणार पुनरागमन?

शारजाह – शानदार लयात असलेला इंग्लंड संघ आयसीसी टी-२० विश्वचषकातील ग्रुप एकमधील सामन्यात सोमवारी येथे जेव्हा श्रीलंकाविरुद्ध मैदानात उतरेल, तेव्हा त्यांचे प्रयत्न सेमिफायनलमध्ये जागा पक्के करण्यावर असेल.

इंग्लंडला स्पर्धेत जेतेपदाचे प्रबळ दावेदार समजले जात आहे व संघाने सुरुवातीचे तिन्ही सामने आपल्या अंदाजात जिंकले. त्यात कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियावरील प्रभावशाली विजयाचा समावेश आहे. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील संघ सर्व कमजोर कडी पूर्ण करत येथे पोहचली. त्यांच्याकडे खेळाडूंचा पर्याय ही आहे, पण अद्याप त्यांच्याकडे पर्याय वापरायची गरज भासली नाही. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ विकेटच्या प्रभावशाली विजयाने दुसऱ्या संघांना संदेश दिला की, त्यांना जेतेपदाचे दावेदार का समजले जात आहे? इंग्लंडसाठी चिंतेची बाब अशी की, त्यांची मधली फळी लयात नाही. तिन्ही सामन्यात मोठ्या विजयामुळे मधल्या फळीला जास्त संधी मिळालेली नाही, पण कर्णधार मॉर्गनला विश्वास आहे की, गरजेच्या वेळी फलंदाज चांगली कामगिरी करतील. मॉर्गनला जरी फलंदाजीची संधी मिळाली नाही, तरी त्याचे नेतृत्व शानदार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲरोन फिंचचा कमकुवत फायदा घेण्यासाठी लेग स्पिनर आदिल राशिदकडून गोलंदाजीची सुरुवात केली. या सामन्याआधी मोईन अलीने जबाबदारी घेतलेली पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या गोलंदाजीची गरज पडली नाही. वेगवान गोलंदाज ख्रिस वॉक्स नव्या चेंडूने शानदार दिसला, ख्रिस जॉर्डनने ३ विकेट घेत लयात आल्याचे संकेत दिले. अखेरच्या काळात विशेषत टायमल मिल्स ऑस्ट्रेलियाविरुद्ध थोडा महाग दिसला, पण तो संपूर्ण स्पर्धेत विकेट घेण्यास यशस्वी राहिला आहे. अशात मॉर्गनला गोलंदाजीत एक पर्याय मिळाला आहे. शारजाहमध्ये इंग्लंडचा दबदबा रोखण्यासाठी श्रीलंकेला काही खास करावे लागेल. श्रीलंकन खेळाडूंची अनुभवहिनता पाहण्यास मिळाली, स्पर्धेत त्यांची कामगिरी खूप खराब राहिली. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सामना गमावला, पण अखेरच्या षटकात त्यांच्याकडे सामना जिंकण्यास संधी होती. चरिथ असलंका शानदार लयात असून तर सलामी फलंदाज पथुम निसंकाने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध चांगली फलंदाजी केली. या विश्वचषकात श्रीलंकेचे गोलंदाज चांगल्या लयात आहेत. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …