इंग्लंडचा बांगलादेशवर ८ विकेटने विजय

अबुधाबी – इंग्लंडने शानदार गोलंदाजीनंतर सलामी फलंदाज जेसन रॉय (६१)च्या अर्धशतकाने आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक सुपर-१२ ग्रुप एकच्या आपल्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा ८ विकेटने पराभव करत दुसरा विजय नोंदवला.

मागील सामन्यात वेस्ट इंडिजवर शानदार विजय नोंदवणाऱ्या इंग्लंडचा संघ ग्रुप एकच्या गुणतालिकेत ४ गुणांसह पहिल्या स्थानी पोहचला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी बांगलादेशला ९ बाद १२४ धावांवर रोखले. सामनावीर ठरलेला जेसन रॉय व जॉस बटलरने संघाला चांगली सुरुवात करून दिली. जेसन रॉयने ३८ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह अर्धशतक झळकावले, ज्यामुळे इंग्लंडने १४.१ षटकांत २ बाद १२६ धावा करत विजय मिळवला. दरम्यान, संघाने जॉस बटलर (१८)च्या
रूपात ३९ धावांत पॉवर प्लेमध्ये आपला पहिला विकेट गमावला. त्यानंतर ही पहिल्या फळीतील फलंदाजांनी त्यांचा विजय सुनिश्चित केला. जेसन रॉय व डेव्हिड मलान यांच्यातील दुसऱ्या विकेटसाठी ४८ चेंडूंत ७३ धावांची भागिदारी रचली गेली. ही भागीदारी १३ व्या षटकात शोरिफुल इस्लामने तोडली. डेव्हिड मलान २५ चेंडूंत ३ चौकारांसह २८ धावा व जॉनी बेअरस्टॉ ८ धावा करत नाबाद राहिला. त्याआधी बांगलादेशसाठी मुश्फिकुर रहिम २९ धावा करत सर्वोच्च स्कोरर राहिला, तर कर्णधार महमुदुल्लाहने १९ धावांचे योगदान दिले. अखेर नासुम अहमदने ९ चेंडूंत २ षटकार व एक चौकार ठोकत नाबाद १९ धावा करत बांगलादेशला १२४ धावांपर्यंत पोहचवण्यास मदत केली. इंग्लंडसाठी पुन्हा एकदा अष्टपैलू मोईन अलीने पॉवरप्लेमध्ये दोन धक्के दिले. त्याने १८ धावा देत दोन विकेट मिळवल्या. टिमाल मिल्सने अखेरच्या षटकात दोन खेळाडूंना बाद करत आपल्या ४ षटकात २७ धावा देत ३ विकेट मिळवल्या. लियाम लिविंगस्टोनने ३ षटकात १५ धावा देत २ विकेट मिळवल्या, तर ख्रिस वॉक्सने ४ षटकात फक्त १२ धावा देत एक विकेट मिळवला. वेस्ट इंडिजला मागील सामन्यात ५५ धावांवर गारद करणाऱ्या इंग्लंडच्या गोलंदाजांनी या सामन्यात देखील तिच कामगिरी केली. बांगलादेशने दोन्ही सलामी फलंदाजांच्या विकेट तिसऱ्या षटकात गमावले. लिटन दास (०९) दुसऱ्याच षटकात लिविंगस्टोनला सोप्पा झेल दिला. तर मोहम्मद नईम (०५) ही सोप्पा झेल देत माघारी परतला. बांगलादेशने अशाप्रकारे १४ धावांवर दोन विकेट गमावल्या. त्यानंतर बांगलादेशच्या फलंदाजांची लाईनच लागली. ज्यातून ते सावरू शकले नाहीत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …